Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फक्त ‘डेटा एंट्री’ नव्हे तर ‘या’ 15 प्रकारच्या नोकऱ्या येणार संपुष्टात, एआय घेणार जागा

11

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. अशी चर्चा जेव्हापासून एआयची लाट आली आहे तेव्हापासून सुरु आहे. काही एक्सपर्ट म्हणतात की असं होणार नाही कारण एआय टूल मानवाची जागा घेऊ शकत नाही. तर काहींच्या मते एआय माणसांची जागा सहज घेऊ शकतं.

आता ओपनएआयच्या चॅट टूल ChatGPT 4o चं एक उत्तर सोशल मीडियावर वायरल होत आहे. या उत्तरात चॅटजीपीटीच्या लेटेस्ट व्हर्जननं, ‘आगामी काळात कोणत्या नोकऱ्यांमध्ये माणसांची जागा घेईल?’ या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना एआयनं 15 अशी कामे सांगितली आहेत जी एआय मानवापेक्षा चांगली करू शकतो. त्यामुळे कंपन्या या कामांसाठी माणसांच्या ऐवजी एआयची निवड करू शकतात.

एका एक्स युजरनं एक लिस्ट शेयर केली आहे जी ChatGPT 4oच्या मदतीनं तयार करण्यात आली आहे. ChatGPT 4o नं या लिस्टमध्ये त्या नोकऱ्यांची नावे दिली आहेत ज्यांची जागा एआय घेईल. ChatGPT 4oनुसार पहिली नोकरी डेटा एंट्री क्लर्कची असेल जी एआयमुळे धोक्यात येईल.
क्रिश आणि भूमी ठरतील भारताचे पहिले सरकारी AI अँकर, या दिवशी DD Kisanवर करतील पदार्पण

एक्सपर्टनुसार, डेटा एंट्रीचं काम एआय माणसांच्या तुलनेत चांगलं आणि फास्ट करू शकतं. तसेच टेली मार्केटर, कस्टमर केयर, मार्केट रिसर्च आणि कॉपी राइटरची नोकरी ChatGPT 4o मुळे संपुष्टात येईल. त्याचबरोबर ग्राफिक्स डिजाइनरची नोकरी देखील ChatGPT 4o मुळे धोक्यात आहे. ChatGPT 4o च्या मते न्यूज रिपोर्टर म्हणजे पत्रकारांची नोकरी देखील एआय घेईल.

ChatGPT 4o चे फीचर्स

GPT 4o मधील ‘o’ म्हणजे ओमनी-मॉडेल हे GPT-4 टर्बो मॉडेलच्या तुलनेत दुप्पट वेगवान आहे. यातील रिस्पॉन्सची लॅटन्सी सुधारण्यात आली आहे. त्यामुळे GPT-4o आता रिअल टाइममध्ये प्रश्नांची उत्तरे देऊ शकतं. भावनिक आवाजांचा सपोर्ट असल्यामुळे GPT-4o माणसांप्रमाणे बोलू शकतो. त्यामुळे त्याच्या प्रतिक्रियांमध्ये व्हॉइस मॉड्युलेशन पाहायला मिळतात. तसेच हे AI माणसाच्या भावनाही ओळखू शकते आणि त्यानुसार प्रतिक्रिया देऊ शकते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.