Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नव्या रंगात सजला नथिंगचा स्वस्त ‘ट्रान्सपरंट’ फोन; 12GB रॅम व्हेरिएंटची इतकी आहे किंमत

10

Nothing नं Nothing Phone 2a चा स्‍पेशल एडिशन लाँच केला आहे. यात ओरिजिनल मॉडेल प्रमाणे ट्रान्सपरंट डिजाइन आहेच, त्याचबरोबर बॅक पॅनलवर लाल, पिवळा आणि निळ्या रंगाच्या हायलाइट्स आहेत, त्यामुळे फोन वेगळा वाटतो. स्पेशल एडिशन मॉडेलचा मेन कलर व्हाइट आहे, तर कॅमेरा मॉड्यूलच्या चारही बाजूंना खालच्या बाजूला काही भागात ग्रे रंगाचे हायलायटर आहेत. कॅमेरा मॉड्यूल ब्‍लू कलरचा आहे, तर काही एलिमेंट्स लाल आणि पिवळ्या रंगामुळे उठून दिसतात.

Nothing Phone 2a Special Edition ची किंमत

Nothing Phone 2a Special Edition ची किंमत 12GB RAM आणि 256GB स्‍टोरेज मॉडेलसाठी 27,999 रुपये आहे. Phone 2a Special Edition 5 जूनपासून Flipkartच्या माध्यमातून खरेदी करता येईल. निवडक बँकाच्या कार्ड्सवर 1 हजार रुपयांचा डिस्‍काउंट दिला जात आहे.रील व्हिडीओ बनतील जबरदस्त 50MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह Oppo चे दोन फोन लाँच; इतकी आहे किंमत

Nothing Phone 2a चे स्पेसिफिकेशन्स

Nothing नुसार पहिल्यांदाच कंपनीनं रेड, येलो आणि ब्‍लू कलर्स एकाच डिव्हाइसवर दाखवण्यात आले आहेत. यात 6.7 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,412 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 30Hz ते 120Hz पर्यंतचा अडॅप्टिव रिफ्रेश रेट, 394ppi पिक्सल डेंसिटी आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सिक्योरिटीचा समावेश आहे. स्क्रीनमध्ये HDR10+ सपोर्ट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 2160Hz PWM फ्रीक्वेंसी आणि 1,300 nits पीक ब्राइटनेस आहे.

Nothing Phone 2a मध्ये ऑक्टा-कोर 4nm मीडियाटेक Dimensity 7200 Pro SoC चा समावेश आहे, सोबत 12GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. नथिंग फोन 2a मध्ये 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज मिळते. फोन Android 14 आधारित Nothing OS 2.5 वर चालतो. यात तीन वर्ष Android अपडेट आणि चार वर्ष सिक्योरिटी पॅच मिळणार आहे.

Nothing Phone 2a मध्ये दोन 50-मेगापिक्सल सेन्सरसह ड्युअल-कॅमेरा सेटअप मिळतो. मेन 50-मेगापिक्सल सेन्सरमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायजेशनचा सपोर्ट मिळतो. सोबत 50 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड-अँगल सेन्सरमध्ये 114-डिग्री फील्ड ऑफ व्यू आहे. फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये 5G, 4G एलटीई, वाय-फाय 6, वाय-फाय 6 डायरेक्ट, ब्लूटूथ 5.3, एनएफसी, जीपीएस, GLONASS, GALILEO, QZSS, 360 डिग्री अँटीना आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. हा हाय-डेफिनिशन मायक्रोफोन आणि ड्युअल स्टीरियो स्पिकरसह येतो. यात IP54-रेटेड बिल्ड मिळते. Phone 2a मध्ये 45W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.