Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fact Check : मनोज तिवारी यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचं सत्य

11

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जूनला निकाल लागणार आहे. मात्र, निकालापूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ भाजप खासदार आणि ईशान्य दिल्लीतील लोकसभा उमेदवार मनोज तिवारी यांचा आहे. भाजपचे उमेदवार आधीच निवडणुकीत पराभव स्वीकारताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा असून व्हायरल होत असलेला व्हिडिओत मुलाखतीचा छोटासा भाग दाखवला जात आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मनोज तिवारी पत्रकार अनिल शारदा यांना सांगतात दिसतात की, मला माझ्या पराभवाची जाणीव झाली. दुःखाची गोष्ट ही आहे की मी खूप दिवसांपासून जिंकत होतो आणि आता हा पराभव आला आहे. मनोज तिवारी २००९ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित एका घटनेचा संदर्भ देत असल्याचं तपासात समोर आलं आहे. यावेळी त्यांनी पराभवाबद्दल भाष्य केलं होतं, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनोज तिवारी यांचा व्हायरल व्हिडिओ या खालील खोट्या दाव्यासह शेअर करत सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ‘आपला पराभव आधीच मान्य केला आहे, अशा परिस्थितीत भाजपचे ४०० च्या पुढे विजयाचे ध्येय कसे पूर्ण होणार?’ या कॅप्शनसह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओचं संपूर्ण सत्य.

फेसबुक पोस्ट । आर्काइव पोस्ट

Fact Check: कन्हैया कुमारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, ८ वर्ष जुन्या फोटोमागचं सत्य काय?

तपासात काय समोर आलं?

Fact Crescendo ने व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली. या पडताळणीत व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला ‘जिस्ट’चा वॉटरमार्क दिसला. त्याच्या मदतीने, कीवर्ड शोधून मूळ व्हिडिओ आढळला. ही पूर्ण मुलाखत ‘जिस्ट’च्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेली आढळली. व्हिडिओ ३१ मार्च २०२४ रोजीचा आहे. यामध्ये पत्रकार अनिल शारदा त्यांना गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा किस्सा विचारतात.

याला आपल्या आयुष्यातील एक रंजक चॅप्टर असल्याचं सांगताना मनोज तिवारी म्हणतात, अमरसिंहजी यांनी यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. २००९ च्या निवडणुकीपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या घरी यासाठी एक बैठक झाली होती. या बैठकीत अनिल अंबानी देखील उपस्थित होते. मला निवडणूक लढवायची नव्हती पण ठामपणे नाही म्हणता आलं नाही.

यावेळी मनोज तिवारी असंही सांगतात, की त्यांना निवडणूक लढवायची नव्हती कारण ते योगी आदित्यनाथ यांचे समर्थक होते आणि विद्यार्थी असताना ते ABVP कार्यकर्ताही होते. टाइमलाइनमध्ये पुढे ३४ मिनिटं ४ सेकंदांपासून ३४ मिनिटे १५ सेकंदांपर्यंत व्हायरल व्हिडिओचा भाग येतो. ज्यात मनोज तिवारी म्हणतात, ‘निवडणुका संपल्यानंतर लगेच आम्हाला आमचा पराभव समजला होता. पण दुःखाची गोष्ट ही की मी खूप दिवस जिंकत होतो आणि जिंकत होतो आणि आता हा पराभव आला आहे.’

मनोज तिवारी यांचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडीओचा परभवाचा भाग कट करून तो व्हायरल करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

आर्काइव

त्याशिवाय दैनिक भास्करकडून एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये मनोज तिवारी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. २००९ मध्ये मनोज तिवारी यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून १५वी लोकसभा निवडणूक लढवली होती. या काळात भाजपचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांच्याकडून निवडणूक हरल्यानंतर ते तिसऱ्या क्रमांकावर होते. यानंतर मनोज तिवारी बाबा रामदेव यांच्या रामलीला मैदानावरील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि २०११ मध्ये अण्णा आंदोलनात सक्रिय राहिले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ईशान्य दिल्ली लोकसभेची जागा जिंकत संसदेत पोहोचले.

आर्काइव

अखेर व्हायरल व्हिडिओ आणि मूळ व्हिडिओची पडताळणी केली. संपूर्ण व्हिडिओमध्ये मनोज तिवारी २००९ मध्ये गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची कहाणी सांगत होते. त्यांनी सांगितलं की, मला पराभवाची जाणीव झाली आहे. याचा अर्थ त्यांचा जुना व्हिडिओ अर्धा कापून सध्या सुरू असलेल्या निवडणुकांशी जोडला जात आहे.

निष्कर्ष

Fact Crescendo च्या पडताळणीत मनोज तिवारी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. याचा सध्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ २०१९ चा आहे. या व्हिडिओत ते एका मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढल्यानंतर पराभव स्वीकारल्याची बाब सांगत होते.

(This story was originally published by Fact Crescendo, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.