Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Temperature Increase : शरीराची लाहीलाही होतेयं, जगभरात एवढे तापमान कसं काय वाढलं? धक्कादायक अहवाल आला समोर..
जीवाश्म इंधनाचा जास्त वापर केल्याने तापमान वाढले
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी झालेल्या हवामान बदलामुळे पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना सरासरी २६ दिवस जास्त उष्णता सहन करावी लागली आहे.जर हवामान बदल झाला नसता तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. २०२३ मध्ये पृथ्वीवर सर्वाधिक उष्णतेची नोंद झाली होती. त्याचं प्रमुख कारण जीवाश्म इंधन जाळणे हे आहे. त्यामुळे मे महिन्यापासून जगातील सुमारे ८०% लोकसंख्येला प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.
आपण पृथ्वी गरम केली नसती तर उष्णता वाढली नसती
आपण जीवाश्म इंधन जाळून पृथ्वी गरम केली नसती तर इतकी उष्णता वाढली नसती, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. संशोधन करत असताना शास्त्रज्ञांनी गणितीय मॉडेल तयार करून पृथ्वीच्या तापमानाचा अंदाज लावला. त्यामध्ये त्यांना उष्णतेतील फरक सर्वत्र भिन्न जाणवला.अनेक देशांमध्ये केवळ दोन किंवा तीन आठवडे तीव्र उष्णता जाणवली. तर कोलंबिया, इंडोनेशिया आणि रवांडा सारख्या देशांमध्ये १२० दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णता जाणवली.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने सुद्धा केला तापमानवाढीचा अभ्यास
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भुवनेश्वरने देशातील तापमानवाढीवर संशोधन केले आहे. त्यात असे आढळून आले की, वाढत्या शहरीकरणामुळे भारतातील १४० हून अधिक प्रमुख शहरांच्या रात्री त्यांच्या आसपासच्या गैर-शहरी भागांपेक्षा ६० टक्के जास्त उष्ण आहेत. शहरीकरणाचा सर्वात मोठा परिणाम अहमदाबाद, जयपूर, राजकोटमध्ये दिसून आला आहे. तर या यादीत दिल्ली चौथ्या स्थानावर तर महाराष्ट्रातील पुणे पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच या शहरांमध्ये जास्त प्रमाणात तापमानवाढ दिसून आली आहे.