Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अट्टल घरफोड्या वर्धा पोलिसांचे ताब्यात,वर्धा परीसरातील ४ घरफोडीचे गुन्हे केले उघड…

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

करवीर कोल्हापुर येथील अट्टल घरफोड्यास वर्धा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन वर्धा शहरातील ४ घरफोडीचे गुन्हे केले उघड,तपासात त्याने एकुन ५४ घरफोड्या केल्याचे निष्पन्न….

वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, वर्धा शहरात दिनांक 27/05/2024 रोजी एकुण चार घरफोडीचे गुन्हे दाखल
झाल्याने यांचे गांभीर्य लक्षात घेता सदरच्या घरफोडी ह्याचा उलगडा करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांनी  पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधीत प्रभारिंना देण्यात आले होते त्याअनुषंगाने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेणे करीता प्रभावी पणे शहरात पेट्रोलींग करुन संशईत इसम मिळुन आल्यास कसून चौकशी करण्याचे आदेश दिल्यावरुन वर्धा शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक हे खाजगी वाहनाने शहर हद्दीत  पेट्रोलींग करीत  असतांना त्यांना नागरीका कडुन माहिती मिळाली की, घरफोडी झालेल्या ठिकाणी कथीया रंगाचे चेकचे शर्ट घातलेला व काळी बॅग खांदयावर घेऊन मोटारसायकल ने एक इसम संशईतरित्या फिरत होता

अशी माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी जाऊन संबंधीत संशईत ईसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत काशीनाथ करोशी वय 38 वर्ष रा. इस्कुर्ली ता. करवीर जि. कोल्हापुर यास नागरीकांचे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे खांदयावर असलेल्या काळया रंगाचे बॅगची पाहणी केली असता सदर बॅग मध्ये त्याचे शर्ट व फुलपॅन्ट तसेच 1) तिन लोखंडी टॉमी, 2) दोन हिरव्या रंगाचे हॅन्डल असलेले स्कु ड्रॉयव्हर 3)पिवळया रंगाचे ग्लास कटर 4) चाबीचे तिन गुच्छे लॉकरचे, दोन मोटारसायकलच्या च्या चाबी, एक फोर व्हीलरची चाबी. तसेच सोन्याचे दागीने व नगदी 500 रू. 100 रू. 200 रू 50 रू 20 रू 10 रू च्या नोटा चे बंडल असे मिळुन आल्याने त्यास त्यासंबंधी विचारपुस केली असता त्याने कबुल केले की त्याने सात दिवसापुर्वी मेहकर येथुन स्प्लेंन्डर प्लस मो.सा.क. एम. एच 28 ए.ए. 4021 हि चोरली त्या नंतर दिनांक 25/05/24 रोजी चे रात्री दरम्यान अमरावती येथे दोन घरफोडया केल्या परंतु त्याला समाधान कारक दागीने व पैसे मिळुन न आल्याने तो यवतमाळ येथे आला लॉज मध्ये मुक्काम करुन यवतमाळ शहराची रेकी केली व दि 27/05/24 रोजी सकाळी अंदाजे 11.00 वा चे दरम्यान यवतमाळ येथे घरफोडी केली. तेथे सुध्दा समाधान कारक पैसे व दागिणे मिळुन आले नाही म्हणुन तो वर्धा येथे आला चार घरफोडया केल्याचे सांगीतले.

पोलीसांनी त्याचे जवळील असलेल्या बॅग मधील 1) सोन्याचे पॉलीश असलेली 25 ग्रमची पदक असलेली पोत किमत 6000/ रु. 2) एक सोन्याचे दानी अंदाजे वजन 10 ग्रम किमत 60000 / रू. 3) एक सोन्याचे मंगळसुत्र पदक असलेले वजन 20 ग्रम किमत 12000 /- रु. 4) एक सोन्याची चैन वजन अंदाजे 05 ग्रम किमत अंदाजे 30000/ रू. 5) एक सोन्याचे कानातील जोड वजन अंदाजे 03 ग्रम 18000/ रू.6) दोन सोन्याचे अंगठी एकुन वजन 10 ग्रम किमत 60000 / रु. 7 ) एक पिवळया धातुचा चौकनी शिक्का वजन अंदाजे 05 ग्रम किमत 30000 / रु. 8) एक पिवळया धातुचा चौकोनी शिक्का अंदाजे 05 ग्रम किमत 30000 /रु. 9) एक सोन्याचे बदामी पदक असलेली काळया मन्याची पोत त्यामधे 10 पिवळे मनी वजन अंदाजे 06 ग्रम किमत अंदाजे 36000 / रू. 10 ) एक सोण्याचे जिवती वजन अंदाजे 02 ग्रम किमत 12000/रु. 11) एक सोन्याचे तनिश्क कंपनीचा लोगो असलेला गोलाकार शिक्का वजन अंदाजे 10 ग्रम किमत 60000/रु. 12) सोन्याचे तिन कानातील पुर्ण जोड झुमके वजन अंदाजे 06 ग्रम किमत 36000/रु.13) एक सोन्याचे एका कानातील रिंग वजन 01 ग्रम किमत 6000/ रु. 14 ) एक सोन्याचे गळयातील पांढरे तोंड असलेला पेन्डन्ट वजन 01 ग्रम किमत 6000/ रु. 15) सोन्याचे लहान मोठे 05 मनी वजन अंदाजे 01 ग्रम किमत 6000/रु. 16) पिवळया धातुचा कानातील एक तार वजन 01 ग्रम किमत 6000/ रु. 17 )
पिवळया धातुचे पॉलीश निघालेले दोन कानातील जोड वजन अंदाजे 06 ग्रम किमत 36000 / रु. 18) एक जुना वापरता विवो कंपनीचा स्काय ब्लु रंगाचा मोबाईल किमत 10000 / रु. 19 ) एक जुना वापरता विवो कंपनीचा कथीया रंगाचा मोबाईल किंमत 12000 / रु. 20) एक जुना वापरता एम. आय कंपनीचा सिल्हर
रंगाचा मोबाईल किंमत 5000 / रु. 21) एक जुनी  मोटारसायकल हिरो स्प्लेन्डर प्लस काळया रंगाची क एम. एच. 28 ए.ए. 4021 किमत अंदाजे 50000/ रु.22 ) चारचाकी वाहनाची एक चावी, मोटार सायकलच्या दोन चाबी, लॉकरचे तीन चाबी गुच्छे एकुन किमत अंदाजे 00/00रु. 23) तिन लोखंडी रॉडच्या वेगवेगळया टॉमी, वेगवेगळे आकार असलेले एकुन किमत अंदाजे 100 / रु. 24 ) एक ग्लास कर्टर किमत 50 / रू. 25) दोन हिरवी रंगाची प्लास्टिकची मुठ असलेले स्कु ड्रायव्हर किमत 40 / रु. 26) नगदी 500 रू च्या 108 नोटा, 100 रू च्या 111, 200 रू च्या 08 नोटा 50 रू च्या 06 नोटा 20 रू च्या 05 नोटा 10 रू च्या 13 नोटा
असा एकुन किमत 720420 / रु. असा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीस वर्धा शहर येथे फिर्यादी सौ. नंदा मारूती सरोदे वय 50 वर्षे रा. माटे ले आऊट, शिवार्पणनगर, नालवाडी, अप.क्र. 872/24 कलम 380,454 भा. द. वी. चे गुन्हयात अटक केली असुन तपासात सदर घरफोडया याने वर्धा शहर येथे 02 व सावंगी मेघे पोलिस स्टेशन येथे 02 केल्याचे तपासात निष्पन्न झाले वर्धा जिल्हयात केलेल्या 4 घरफोडीत 7,20,420 / रू मुद्देमाल केला जप्त

तसेच सदर आरोपी हा अट्टल घरफोडया करणारा असुन यापुर्वी त्याचेवर 2018 मधे कोल्हापुर पोलिसांनी त्यास 32 घरफोडया मधे व 2020 मधे 22 घरफोडी कोल्हापुर व 4 घरफोडी बेळगाव केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली होती..
1)यातील अट्टल घरफोडी करणारा चोरटा प्रशांत काशिनाथ करोशी वय 38 वर्षे रा. ईस्पुर्ली त. करविर जि. कोल्हापुर यांने एक महीण्यापुर्वी बेंगलोर,कर्नाटका तसेच चैन्नई तामिळनाडु व हैदराबाद तेलगांणा  घरफोडी करण्याचा केला होता प्लॅन, त्यासाठी तो तेथील लॉज मध्ये राहुन ज्या परीसरात मोठे मोठे हायप्रोफाईल बंगले आहे अश्या सोसायटीत भाडयाचे रिक्षाने फिरून तेथील परीसराची  पाहणी करायचा तसेच त्या सोसायटीत  असलेल्या बॅटरीचे करंट कसा ओलांडाचा याचेबाबत माहीती तो यु ट्युबवर घेत होता
भविष्यात त्याला फोडयाचे होते बॅकेचे लॉकर त्यासाठी तो गुगल मॅपवर सर्च करीत होता

यापुर्वी त्याला सन 2018 व 2020 साली कोल्हापुर स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून उघड केले होते 54 घरफोडीचे गुन्हे त्याचप्रमाणे त्याचेवर यापुर्वी जबरी चोरीचा सुध्दा एक गुन्हा नोंद आहे प्रेमिकेची हौस पुर्ण करण्या करीता केली त्याने घरफोडी करण्याची सुरूवात घरफोडी करणे करीता चोरी करायचा मोटर सायकल व घरफोडी केल्यानंतर ती मोटर सायकल कुठल्या तरी एका शहरात सोडायचा त्याने वेगवेगळया शहरातुन एकुण चोरी केल्या 13 मोटर सायकल तसेच बेळगांव कर्नाटका येथे केल्या होत्या सन 2020 साली 4 घरफोडी त्यात त्याला अटकही झाली होती, घरफोडीतुन मिळालेल्या पैश्यातुन तो गोवा तसेच इतर पिकनिक पॉईन्टला जावुन मौजमस्ती करायचा

आतापर्यंत त्याने एकुन .कोल्हापुर येथे 54 घरफोडी, अहिल्यानगर येथे 02 घरफोडी करण्याचे प्रयत्न,शहदा जिल्हा नंदुरबार येथे 01 घरफोडी 3 तोळे सोने, 01 प्रयत्न, मोटर सायकल 02 चोरी, 4. धुळे जिल्हा येथे 1 घरफोडी नगदी 5,000/रू व 3 घरफोडीचे प्रयत्न,. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे 02 प्रयत्न,लातुर येथे 01 घरफोडी 01 प्रयत्न, जळगांव सिटी 06 घरफोडीचे प्रयत्न, भडगांव जि. जळगांव येथे 18 ते 20 तोळयाची तसेच 15,000/रुपये नगदी, चाळीसगांव येथे 02 प्रयत्न, जळगांव सिटी 02 मोटर सायकल 8. अमरावती येथे 03 घरफोडी एकुण माल 12 ग्रॅम सोने व 58,000 / रूपये नगदी, अमरावती 01 मोटरसायकल चोरी,वडगांव यवतमाळ येथे 02 ग्रॅमची घरफोडी, पुणे सिटी येथे 05 मोटरसायकल चोरी, लातुर येथे 02 मोटरसायकल चोरी, मेहकर जि. बुलठाणा 01 1बेळगांव कर्नाटका येथे 04 घरफोडी, इंदोर मध्य प्रदेश  येथे 01 घरफोडी 50,000/- रूपये नगदी. अश्या एकुन62 घरफोडी, 15 घरफोडीचे प्रयत्न, 13 मोटर सायकल चोरी असे 90 चोरीचे गुन्हे, तसेच 1 जबरी चोरी, 2 फसवणुकीचे, असे एकुण अंदाजे 93 गुन्हे केलेले आहे.

सदर कारवाई ही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक वर्धा शहर पराग पोटे, प्रभारी ठाणेदार पोलिस निरीक्षक कांचन पांडे आर्थीक गुन्हे शाखा पोलिस स्टेशन वर्धा शहर यांचे उपस्थिीतीत सपोनि गणेश बैरागी, पोउपनि आकाशकुमार साखरे, पंकज हेकाड, पो. हवा  पंकज भरणे, प्रशांत वंजारी, शैलेश चाफलेकर,विजय पंचटीके, किशोर पाटील,नापोशि पवन लव्हाळे,पोशि वैभव जाधव, श्रावण पवार, शिवा डोईफोडे नंदकिशोर धुर्वे, सागर काळे,उज्वल घंगारे, भुशष चव्हाण, सर्व नेमणुक पोलीस स्टेशन वर्धा शहर वर्धा यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.