Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mansoon 2024: वेळेच्या आधीच मान्सूनची एन्ट्री कशी काय? हवामान तज्त्रांनी गुपित सांगितलं, कारण आहे ‘वादळी’!

11

मुंबई : मान्सून वेळेच्या आधी धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD)वर्तवला आहे. हवामान विभागाने बुधवारी २९ मे ला मान्सूनच्या आगमनाची पूर्वसूचना दिली आहे.

हवामान विभागाने सांगितले की, नैऋत्य मोसमी पाऊस अंदाजापेक्षा एक दिवस अगोदर गुरुवारी ३० एप्रिलला केरळच्या किनारपट्टीवर आणि ईशान्येकडील काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर आता नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाहही सुरळीत होत असल्याने मान्सूनच्या केरळमधील आगमनासाठी ही पोषक स्थिती आहे.
Weather Forecast: मान्सूनची चाहूल, आज केरळमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती
दरम्यान काही भागांत ३१ तारखेला मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत होते. तर अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाम या ईशान्येकडील राज्यांत ५ जूनला मान्सूनचा अंदाज असल्याचे सांगितले होते.

हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यानुसार मान्सून वेळेच्या आधी हजेरी लावणार? याबदद्ल देखील चर्चा होत आहेत. यावर आता हवामान तज्ज्ञांनी काही कारणं स्पष्ट केली आहेत.

रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह वेगात

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातून गेलेल्या रेमल चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचला गेला त्यामुळे ईशान्येत मान्सून लवकर दाखल होण्याचे हे एक कारण असू शकते. याआधीही ईशान्येकडील राज्यांतच रेमल चक्रीवादळाचा परिणाम सर्वात जास्त झाल्याचे दिसून येत आहे.
Monsoon 2024: यंदा धो-धो बरसणार! सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता; काय सांगतो IMDचा अंदाज? कुठे किती पाऊस?

रेमलचा ईशान्येकडील राज्यांना मोठा फटका

चक्रीवादळ रेमलमुळे ईशान्येकडील राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि याचा मोठा फटका देखील लोकांना क्रियाकलापांना बसला. भूस्खलनासारख्या घटना घडल्या, ज्यामध्ये ३० लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक बेपत्ता देखील आहेत. यासोबतच काही घरं देखील गाडले गेले आहेत.

अशीच काहीसी स्थिती मिझोराम मध्ये देखील पाहायला मिळाली. मिझोरामच्या आईजोल जिल्ह्यात भूस्खलनामुळे मृतांच्या संख्येने २९ चा आकडा गाठला. याचबरोबर आसाममध्ये ४, नागालँडमध्ये ४ आणि मेघालयमध्ये २ जणांना आपला जीव गमवावा लागला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.