Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मालवाहु ट्रकवरुन मालाची जबरी चोरी करणारी टोळी कलमणा पोलिसांचे जाळ्यात…

14


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

मालवाहु ट्रकवर दरोडा घालणारे आरोपींना कळमना पोलिसांनी केले जेरबंद….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी नागभुषण बालैया अप्पन्नाशेट्टी वय ४४ वर्ष रा. करीमनगर,  कृष्णानगर, बुम्मकल्ल, तेलंगणा यांनी त्यांचे मालवाहक ट्रक क्रमांक टी. एस. ०२ युसी १४३५ यामध्ये तेलंगणा येथील मंडीतुन ३२ टन कच्चे आंबे लोड करुन दि(२७) मे रोजी सकाळी चे ०६.१५ वा. सुमारास, पोलिस ठाणे कळमणा हद्दीत चिखली चौकाचे पुढे काही अंतराहुन जात असतांना ५ ते ७ अनोळखी  ईसमांनी संगणमत करून फिर्यादीचे गाडीचे डाल्यावर चढुन ट्रकमधील ३३० किलो कच्चे आंबे किंमती १९,८०० / रू चा मुद्देमाल पोत्यामध्ये भरून फिर्यादीस धक्का मारून जबरीने चोरी करून घेवुन गेले,

फिर्यादी यांनी आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने दगड उचलुन फिर्यादीचे गाडीचे काचेवर मारून ५००० / रू चे नुकसान केले व पळुन गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून
पोलिस ठाणे कळमणा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३९५, ४२७ भा. दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासादरम्यान कळमणा पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपासावरून आरोपी क्र १) नारायण उर्फ नाऱ्या सुनिल टंडण वय २२ वर्ष रा. तलमले ले-आउट, ओमनगर, कळमणा, नागपूर २) अंकुश उर्फ लंकेश विलास चांडोले वय १९ वर्ष रा. नागेश्वर नगर, पारडी, ३) मोहम्मद अकरम रूस्तम शेख वय २१ वर्ष रा. गौरी नगर, कळमणा ४) कृष्णकांत उर्फ राम संजय काळे वय २२ वर्ष रा. गंगाबाग भवन जवळ, पारडी, कळमणा ५) शेख कलीम शेख सलीम वय २२ वर्ष रा. म्हाडा क्वॉटर नं. ४२, चिखली, कळमणा, नागपुर, यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, आरोपींनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन ३३० किलो कच्चे आंबे किंमत १९,८००/रू चा मुद्देमाल व चोरी करून पळुन जातांना वापरलेले वाहन असा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(उत्तर विभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उपायुक्त (परि क्र. ५), सहायक पोलिस आयुक्त (कामठी विभाग)विशाल क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. गोकुल महाजन, सपोनि उज्वल इंगोले, सफौ. गंगाधर मुटकुरे, पोहवा. विशाल अंकलवार,विशाल भैसारे, नापोशि. यशवंत अमृते, पोशि. ललीत शेंडे,वसीम देसाई यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.