Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

corona in maharashtra करोना: राज्यात आज दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; मात्र, मृत्यूसंख्या घटल्याने दिलासा

61

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण २ हजार ४१३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच आज मृत्यूंची संख्या देखील कमी झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. मात्र, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही किंचित वाढली असल्याने हे काहीसे चिंताजनक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ६८१ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या २ हजार ८७६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण २ हजार ४१३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या २ हजार ७६३ इतकी होती. तर, आज ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ९० इतकी होती. (maharashtra registered 2681 new cases in a day with 2413 patients recovered and 49 deaths today)

आज राज्यात झालेल्या ४९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ९४ हजार ०७५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के इतके झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- आयकर विभागाच्या छापेमारीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

सक्रिय रुग्णसंख्येचा ग्राफ पुन्हा सरकला वर

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३३ हजार ३९७ इतकी आहे. काल ही संख्या ३३ हजार १५९ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ८ हजार ८१८ इतका खाली आला आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ४ हजार १५६ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ०२० आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या १ हजार ९४३ वर आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार २३९ इतकी आहे. तर, सांगलीत एकूण ८५२ आहे.

क्लिक करा आणि वाचा- कारखान्यांवर छाप्यासंबंधी रोहित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, कालच…

मुंबईत उपचार घेत आहेत ५,७११ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ७११ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६२८ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६७१, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८५९ इतकी खाली आली आहे.

नंदुरबार, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४७९, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९१ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०४ वर आली आहे. तर नंदुरबार आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये राज्यातील सर्वात कमी म्हणजेच १ सक्रिय रुग्ण आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला पकडून आणणाऱ्या के. पी. गोसावीला पुणे पोलिस शोधतायत

२,३९,५८७ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ९७ लाख ६६ हजार ९५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ७० हजार ४७२ (११. टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३९ हजार ५८७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ३२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.