Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने विशिष्ट वर्गाला द्वेषापूर्ण शब्द वापरले नाहीत: मनमोहन सिंग

12

म .टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : पदाची प्रतिष्ठा आणि गांभीर्य कमी करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत अशी घणाघाती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी केली. डॉ. सिंग यांनी पंजाबच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील मतदारांना लिहिलेल्या तीन पानी पत्रात काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात, शनिवारी ( १ जून) मतदान होणार आहे.या निवडणुकीतील शेवटची सभा घेण्यासाठी मोदी गुरुवारी पंजाबमधील होशियारपूर येथे पोहोचले असताना डॉ. सिंग यांनी पंजाबच्या जनतेला लिहिलेले पत्र सार्वजनिक झाले. मोदींनी पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपवर निशाणा साधताना, इंडी आघाडीच्या लोकांनी मला तोंड उघडायला लावू नये, मी यांच्या ७ पिढ्यांची पापे उघड करीन. मोदी सैन्याचा अपमान सहन करणार नाहीत, असे टीकास्त्र सोडले होते.
Farmer Protest: शंभू सीमेवर शेतकऱ्यांची फौज; ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला शंभर दिवस पूर्ण

याच पार्श्वभूमीवर डॉ. सिंग यांनी स्पष्टपणे नमूद केले की मोदींनी निवडणुकीदरम्यान द्वेषपूर्ण भाषणाचा सर्वात निंदनीय प्रकार स्वीकारला आहे. इतिहासात आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने समाजातील विशिष्ट वर्गाला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी असे द्वेषाने भरलेले आणि असंसदीय शब्द उच्चारले नाहीत. असे करून मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा रसातळाला नेली. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या दहा वर्षात पंजाब, पंजाबी आणि पंजाबियत यांना बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.
Rahul Against Modi: मोदींनी देवाची कथा का काढली माहिती? अदानींवरुन राहुल गांधींनी मोदींना पुन्हा घेरले

‘मनमोहन सिंग यांनी त्यांच्या एका वक्तव्यात म्हटले होते की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे’, असा दावा पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. सिंग यांनी मोदींच्या प्रचारातील ‘कमालीच्या द्वेषपूर्ण’ भाषणांचा उच्चार केला आहे.
लोकसभेत भाजपच्या स्वबळावर ३७० जागा, कोठून आला हा नंबर; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले

शेतकऱ्याचे सरासरी मासिक उत्पन्न केवळ २७ रुपये

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या वचनाचे उदाहरण घेऊन डॉ. सिंग यांनी म्हटले की, मोदी सरकारच्या धोरणांमुळे गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांची कमाईच नष्ट झाली आहे. आज शेतकऱ्यांचे दैनंदिन राष्ट्रीय सरासरी मासिक उत्पन्न केवळ २७ रुपये आहे. प्रत्येक शेतकऱ्यावर सरासरी २७ हजार रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. इंधन शेतीशी संबंधित उपकरणांवर जीएसटी तसेच कृषी निर्यात आणि आयातीवरील मनमानी निर्णयांमुळे शेतकरी कुटुंबांची परिस्थिती हलाखीची झाली आहे.
Narendra Modi: भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली, गेल्या १० वर्षाच्या कारकिर्दीबाबत मोदींचा दावा

अर्थव्यवस्थेत गेल्या १० वर्षांत अकल्पनीय उलथापालथ

याच पत्रात डॉ. सिंग म्हणतात की देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या १० वर्षांत अकल्पनीय उलथापालथ झाली आहे. कोविड-१९ महामारी बरोबरच नोटाबंदी, जीएसटी आणि वित्तीय गैरव्यवस्थापनाचीही आपत्ती सरकारने आणली त्यामुळे ही दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
Narendra Modi : महाविनाश आघाडीतील NCP ला कुटुंब पुढे न्यायचंय, म्हणून काँग्रेसमध्ये विलिनीकरण, मोदींचा प्रहार

शेतकरी आंदोलनावरून मोदींवर टीका

दिल्लीच्या सीमांवर २०२०-२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका करताना डॉ. सिंग यांनी म्हटले आहे की, बहुतेक पंजाबमधील शेतकऱ्यांसह सुमारे साडेसातशे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर अनेक महिने झालेल्या आंदोलनात असताना मरण पावले. त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी लाठ्या आणि रबराच्या गोळ्या पुरेशा नव्हत्या तर पंतप्रधानांनी संसदेत आमच्या शेतकऱ्यांना ‘आंदोलक’ आणि ‘परजीवी’ म्हणत हीन भाषेत हल्ला चढवला. शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता त्यांच्यावर लादलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, ही एकच मागणी या शेतकऱ्यांनी केली होती.

मी माझ्या आयुष्यात कधीही एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळे केले नाही

मनमोहन सिंग पुढे लिहितात, गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने पंजाब, पंजाबी आणि पंजाबियत यांना बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. काही चुकीच्या विधानांसाठी मोदींनी मलाही जबाबदार धरले आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळे केले नाही. हे करण्याचा कॉपीराइट फक्त भाजपकडे आहे, असा टोमणा मारताना डॉ. सिंग यांनी आपली राज्यघटना आणि लोकशाहीला निरंकुश सरकारपासून वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असा इशारा दिला आहे.

विख्यात कवी अल्लामा इक्बाल यांच्या एका प्रसिद्ध काव्यपंक्तीचा दाखला देऊन डॉ. सिंग यांनी पत्राचा शेवट केला. त्यांनी लिहिले की, फिर उठी आखिर सदा तौहीद की पंजाब से, मर्द-ए-कामिल ने जगाया हिंद को फिर ख्वाब से।

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.