Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
रेकॅार्डवरील कुख्यात गुन्हेगार चोचु यास त्याचे साथीदारासह अटक करुन,त्यांचे ताब्यातुन गांज्या तसेच चोरीचे दागिने, पैसे व मोटरसायकल केली जप्त….
अमरावती(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये विशेषतः लगतच्या राज्याच्या सीमेवरील भागात अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना प्रत्येक प्रत्येक प्रभारींना तसेच पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना देण्यात आल्या होत्या.
त्याअनुषंगाने दि(२९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपविभाग अचलपुर मध्ये पेटोलिंग करीत असता गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहीती मिळाली कि, दोन इसम त्यांचे मोटर सायकलवर ब्राम्हणवाडा थडी ते शिरजगाव कसबा रोडने अवैधरित्या गांजा विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन येणार आहे. अशा गोपनिय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.(२९) रोजी ब्राम्हणवाडा थडी ते शिरजगाव रोडवर नाकाबंदी करुन सापळा लावुन दोन ईसमांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यातील मोटर सायकल चालक याने त्याचे नाव चोचु उर्फ
रोहीत गजानन मरसकोल्हे वय २८ वर्ष रा.कांडली परतवाडा तसेच मोटर सायकलवर मागुन बसुन असलेल्या इसमाने त्याचे नाव आंनद विकास डायलकर वय २३ वर्ष रा. बोरगाव दोरी ता. अचलपुर असे सांगितले.
दोन्ही संशईत ईसमांची व वाहणाची झडती घेतली असता त्यांचे मोटरसायकलचे हॅन्डलला असलेल्या थैली मध्ये १ किलो ६२३ ग्रॅम गांजा (अंमली पदार्थ) कि.अं. २४,३४५/- रु तसेच त्यांचे अंगझडतीतुन १ ग्रॅम सोन्याचे मनी, चांदीच्या दोन तोरड्या व नगदी २२००/- रुपये मिळुन आले. नमुद आरोपींना त्यांचे कडे मिळुन आलेल्या दागिने, नगदी पैसे व त्यांचे ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्यांनी आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी दोघांनी मिळुन ग्राम लाखनवाडी येथील एका घराचे कुलूप कोंडा तोडुन सदरचे दागिने व नगदी पैसे चोरल्याचे सांगितले. तसेच हिरो स्पेंन्डर प्रो मोटर साकयल क्र. MP 48 1214 हि आठनेर, मध्यप्रदेश येथुन चोरुन आणल्याचे सांगितले.
यावरुन दोन्ही आरोपींनी दिलेल्या कबुली वरुन गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता ग्राम लाखनवाडी येथील घरफोडी संदर्भात पो स्टे शिरजगाव कसबा येथे गुन्हा रजि. क्र. १८२/२४ कलम ४५७,३८० भादवि तसेच हिरो स्पेंन्डर मोटर साकयल क्र. MP 48 1214 बाबत पो स्टे. आठनेर (मध्यप्रदेश) येथे गुन्हा रजि. क्र. २५१/२४ कलम ३७९ भादंवि चा नोदं असल्याचे दिसुन आले.
वरुन दोन्ही आरोपीतांकडुन गांजा कि.२४,३४५/- रु, सोने, चांदीचे दागिने कि..८०००/- रु, नगदी २२०० रुपये व हिरो स्पेंन्डर प्रो मोटर साकयल क. MP 48 1214 कि. अं.५०,००० रुपये असा एकुण ८४,५४५/- रुपये चा मुददेमाल संबधीत गुन्हयात जप्त करण्यात आला. आरोपीकडुन मिळुन आलेल्या गांजा संबधाने दोन्ही आरोपीविरुध्द कलम ८(क),२०(ब)!!(ब) NDPS अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करुन त्यांना पुढील तपासकामी पोलिस स्टेशन शिरजगाव
कसबा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर विविध पोलिस स्टेशनला गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोदं आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधीक्षक,पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा किरण वानखडे,यांचे नेतृत्वात सह.पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने चालक निलेश येते यांनी केली.