Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

50MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त फोन लाँच, लो बजेटमध्ये मोटोरोलाचा धमाका

12

Motorola नं भारतात आणखी एक स्वस्त फोन लाँच केला आहे. Moto G04s 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमती सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्‍सलचा कॅमेरा, प्रीमियम डिजाइन, गोरिल्‍ला ग्‍लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. 5000mAh ची बॅटरी या डिव्हाइसमध्ये देण्यात आली आहे, जी 15वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. नवीन मोटो फोन, लेटेस्‍ट अँड्रॉइड 14 ओएसवर चालतो सोबत युनीसॉक प्रोसेसर यात देण्यात आला आहे आणि 4जीबी रॅम आहे.

Moto G04s ची किंमत

Moto G04s 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्‍टोरेज व्हेरिएंटमध्ये आला आहे. याची किंमत 6,999 रुपये आहे. फोन कॉनकॉर्ड ब्लॅक, सी ग्रीन, स्‍टेन ब्‍लू आणि सनराइज ऑरेंज कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. फोनची विक्री फ्लिपकार्ट, मोटोरोलाडॉटइन व्यतिरिक्त प्रमुख रिटेल स्‍टोर्सवर 5 जून दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल.
मोटोचा सर्वात स्वस्त फोन येतोय भारतात, फ्लिपकार्टवरून होईल विक्री

Moto G04sचे स्पेसिफिकेशन्स

Moto G04s लेटेस्‍ट अँड्रॉइड 14 ओएसवर चालतो. यात युनीसॉक T606 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम जोडण्यात आला आहे आणि इंटरनल स्‍टाेरेज 64 जीबी आहे. कंपनीनुसार, रॅम 8 जीबी पर्यंत एक्‍सटेंड केला जाऊ शकतो. Moto G04s मध्ये कोर्निंग गोरिल्‍ला ग्‍लास 3 चे प्रोटेक्‍शन असलेला डिस्‍प्‍ले आहे. 178.8 ग्राम वजन असलेल्या या डिवाइसला IP52 रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे फोन काहीप्रमाणात पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचू शकतो.

फोनमध्ये 6.56 इंचाचा एचडी प्‍लस IPS LCD डिस्‍प्‍ले आहे. याचे रेजॉलूशन 1612 x 720 पिक्‍सल आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्‍सलचा मेन रियर कॅमेरा देण्यात आला आहे. एलईडी फ्लॅशची देखील सुविधा आहे. फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्‍सलचा आहे. Moto G04s मध्ये 5 हजार एमएएचची बॅटरी आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फीचर्स पाहता फोनमध्ये 2 नॅनो सिम वापरता येतात. एसडी कार्ड वापरण्याचा देखील ऑप्शन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth® 5.0, Wi-Fi, GPS, A-GPS, LTEPP, SUPL, GLONASS, Galileo इत्यादी ऑप्शन मिळतात. चार्जिंग पोर्ट टाइप-सी आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.