Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दरोडा टाकायला आले अन् पोलिसांचे सावज झाले….

12


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयीत इसमांना अग्निशस्त्रानिशी चामोर्शी पोलिसांनी घेतले ताब्यात,नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला….

चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, दि(30) मे रोजी रात्री 10. वा. दरम्यान चामोर्शी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम स्कूलजवळ काही संशयीत इसम फिरतांना दिसून आल्याने तीन इसमांना गावातील नागरीकांनी पकडून ठेवले असून त्यांचे काही साथीदार चारचाकी वाहन घेवून पळून गेले आहे. अशी माहिती पोलिस स्टेशन चार्मोशी प्रभारी अधिकारी  विश्वास पुल्लरवार यांना फोनद्वारे मिळाली.

त्यावरुन प्रभारी अधिकारी पुल्लरवार यांचेसह अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम शाळेजवळ पोहचताच त्यांना सदर ठिकाणी काही इसमांची गर्दी दिसून आली. सदर गर्दी ठिकाणी जाऊन पाहिले असता, गावातील नागरीकांनी तीन संशयीत इसमांना पकडून ठेवले असल्याचे दिसून आल्याने त्या संशयीत इसमांचे नाव विचारले असता, त्यांनी आपले नाव 1) सरताज खान इजहार खान, वय 35 वर्षे रा. रामाळा तलाव, बगल खिडकी, चंद्रपूर तह. व जि. चंद्रपूर, 2) अमन अक्रम खान, वय 22 वर्षे, रा. रामटेकेवाडी ताडबन वार्ड नं. 02 शाई चौक चंद्रपूर तह. व जि. चंद्रपूर व 3) गुलाम अहमद रजब अली वय 32 वर्षे, धंदा-मजूरी, रा. वार्ड नं. 02 राजूर ईजारा पोस्टे राजुर कॉलरी वणी तह. वणी जि. यवतमाळ असे सांगितले. त्यानंतर पकडून ठेवलेल्या संशयीत इसमांची पोलीसांनी  अंगझडती घेतली असता, सरताज खान इजहार खान याचेकडे 14.3 सेमी बॅरेलची लांबी, लाकडी पिस्टल ग्रिप असलेले एक देशीकट्टा (अग्निशस्त्र) अंदाजे किंमत 5000/- व त्यासोबत एक जिवंत 8 एमएम काडतूस अंदाजे किंमत 300/- रु. मिळून आले.

सदर अग्निशस्त्राच्या परवाणाबाबत त्याच्याकडे तपासणी केली असता, त्याचेकडे सदर शस्त्राबाबत कोणताही परवाणा मिळून आला नाही. तसेच अमन अक्रम खान याचेकडे एक निमूळते टोक असलेले धारदार शस्त्र (चाकू) अंदाजे किंमत 500/- रु. व त्यासोबतच रेडमी कंपनिचा मोबाईल अंदाजे किंमत 10,000/- रु. असलेला मिळून आले. यासोबतच गुलाम अहमद रजब अली याचेकडे लाल रंगाचे मिरची पावडरची पुडी अंदाजे किंमत 15/- रु. मिळून आली. सदर संशयीत इसमांची सखोल विचारपूस करुन चौकशी केली असता ते गावातील ज्वेलरी दुकानदार हे दुकान बंद करुन आपल्या सोबत पैशांची बँग घेऊन जात असतात हे यापुर्वी येऊन पाहून गेले होते. त्यासाठी आज ते चंद्रपूर वरुन पाच लोक कारने आले होते. त्यातील तीन इसम हे ज्वेलरी दुकानदार यांचेवर रेकी करत गावात फिरत होते व अन्य दोन साथीदार कारमध्ये बसून होते. तिघही संशयीत इसम गावात फिरत असतांना गावातील लोकांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना लोकांनी पकडून ठेवले असे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यावरुन त्यांचेकडुन मिळून आलेले एक देशी कट्टा (गावठी बंदूक) व जिवंत काडतूस तसेच धारदार शस्त्र (चाकू) असा एकुण 15815/- (अक्षरी पंधरा हजार आठशे पंधरा रु.) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर सदर संशयीत इसम  1) सरताज खान इजहार खान 2) अमन अक्रम खान, 3) गुलाम अहमद रजब अली तसेच कारसह पळून गेलेले दोन इसम हे बंदूक व चाकू दाखवून ज्वेलरी दुकानदार यांचेवर दरोडा टाकण्याचे उद्देशाने आले असल्यामूळे त्यांचेविरुद्ध कलम 399 भादंवि सहकलम 3/25, 4/25 भाहका तसेच मा. जिल्हाधिकारी . गडचिरोली यांचे मनाई आदेश कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याने कलम 135 मपोका अन्वये पोस्टे चामोर्शी येथे गुन्हा दाखल करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे व अन्य दोन फरार आरोपींचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची कारवाई  पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली  सुरज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे चामोर्शी येथील प्रभारी अधिकारी विश्वास पुल्लरवार, पोउपनि. बालाजी लोसरवार, पोउपनि. दुर्योधन राठोड, मपोउपनि. राधा शिंदे, पोहवा  राजेश गणवीर,व्यंकटेश येल्लला यांनी पार पडली.

या घटनेत शहरातील नागरिकांनी सतर्कता बाळगत तीन संशयीत इसमांना पकडून पोलिस  प्रशासनाला सहकार्य केले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. अशाच प्रकारचे सहकार्य नागरिकांनी करावे असे आवाहन  पोलिस अधीक्षकांनी सर्व जनतेला केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.