Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Promate कंपनीने भारतात लाँच केला कॅप्सूल-3′ ब्लूटूथ स्पीकर, किंमत जाणून घ्या

9

प्रोमेटच्या या स्पीकरमध्ये 500mAh Li-ion बॅटरी, RGB LED लाइट्स आणि एकापेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह 5-तासांचा प्लेबॅक टाईम उपलब्ध आहे. कॅप्सूल-3 आता Amazon Indiaवर आकर्षक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्पीकरची किंमत 1999 रुपये इतकी असणार आहे.

Promate’s Capsule-3 मध्ये Bluetooth v5.3 फिचर देण्यात आले आहे, सोबत 10 मीटर पर्यंत कनेक्टिव्हिटी आणि सिमलेस वॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी इनबिल्ट मायक्रोफोन देण्यात आला आहे. शिवाय स्पीकरमध्ये असलेले LumiSound™️ तंत्रज्ञान, ऑटोमॅटिक रेनबो सिंक म्युझिक लिस्निंग एक्सपिरियन्स अधिक वाढवणार आहे. कॅप्सूल-3 मध्ये डीप बास आउटपुट, ट्विन सबवूफर आणि पॅसिव्ह बास रेडिएटर्ससह 5W साउंड ड्रायव्हर आहे जे हाय व्हॉल्यूममध्येही झिरो डिस्टोर्शन देते. यूजर एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी व्हॉल्यूम, मोड, ट्रॅक कंट्रोल आणि एलईडी लाईट कंट्रोलसाठी इंटर्नल कंट्रोल बटण देण्यात आले आहे.

फॅब्रिक-ब्रेडेड हँडल असलेल्या अल्ट्रा-कॉम्पॅक्ट आणि हलक्या वजनाच्या डिझाइनसह, कॅप्सूल-3 प्रवासासाठी सोयीस्कर पोर्टेबल ठरणार आहे. या स्पीकरमध्ये ऑलराऊंड कनेक्टिव्हिटी ऑप्शन वायर्ड आणि वायरलेस दोन्ही सेटअपना सपोर्ट करतात.

स्पीकरचे आणखी एक उल्लेखनीय फिचर म्हणजे TWS Dual Connect. हे युजर्सला सिंक्रोनाइझ केलेल्या मल्टी-रूम ऑडिओ सोल्यूशनमध्ये दोन कॅप्सूल स्पीकर एकत्रितपणेकनेक्ट करण्यास किंवा स्टिरिओ स्पीकर म्हणून वापरण्याची परमीशन देतात.

लॉन्च प्रसंगी बोलताना, प्रोमेट टेक्नॉलॉजीजमधील सेल्स इंडिया आणि सार्कचे प्रमुख श्री गोपाल जयराज म्हणाले, “आम्ही हा स्पीकर भारतातील आमच्या ग्राहकांसमोर आणण्यास उत्सुक आहोत, जिथे जगभरातील बाजारपेठांमध्ये या स्पिकरला आधीच मोठी मागणी मिळाली आहे” आता भारतातही हा स्पीकर लोकप्रिय होईल अशी आशा आम्ही व्यक्त करतो”

कंपनी आता IFA – बर्लिन येथे वायरलेस चार्जर्स आणि पॉवर बँकांच्या लेटेस्ट सिरीजचे लाँचिंग करण्याच्या तयारीत आहे.

ब्लूटूथ स्पीकर खरेदी करताना, तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये स्पीकर रेडिएटर आणि ड्युअल ड्रायव्हर्स सारखी फिचर्स असल्याची खात्री करावी. आम्ही तुम्हाला सांगतो की रेडिएटर तुमच्या स्पीकरचा बास रिस्पॉन्स वाढवतो, तर ड्युअल ड्रायव्हर स्पीकरचे काम पॉवरफुल वॉइस निर्माण करणे आहे. म्हणून, स्पीकर खरेदी करताना, आपण वॉइस क्वालिटीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवल्यास तुम्ही उत्तम डिवाईस खरेदी करू शकता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.