Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
खंडनीसाठी अकोला येथील व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा यांचे अपहरण प्रकरणामध्ये सर्व ०९ आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम १९९९ (मोक्का) अंतर्गत कार्यवाही…..
व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे दि. (१४) मे रोजी अप.क्र २००/२४ कलम ३६४(अ)३६५,३४ भा.द.वि सहकलम ३,२५ शस्त्र अधि १९५९ चा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये अरुणकुमार मदनलाल वोरा यांचे अज्ञात आरोपींनी एका पांढ-या गाडीमध्ये अपहरण केले अशा तक्रारीवरुन पोलिस स्टेशन,रामदासपेठ येथे सदरचा गुन्हा दाखल करून तपास सुरु आहे सदर गुन्हयाच्या तपासामध्ये एकुन ०९ आरोपींवर अटक कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर गुन्हयामध्ये आरोपी १) किशोर पुंजाजी दाभाडे, २) आशिष अरविंद घनबाहदुर, ३)फिरोज खान युसुफ खान, ४) शरद पुंजाजी दाभाडे, ५) मिथुन उर्फ मोंटी सुधाकर इंगळे, ६) इरफान खान
उर्फ राजा सरफराज खान, ७) मनिष उर्फ मन्या गजानन गोपणारायण, ८) चंदन उर्फ चंदु अरुण इंगळे ९) विवेक उर्फ दादु अंबादास वरोटे यांनी संघटीत गुन्हेगारी कृत्य करून सदरचा गुन्हा केला असल्याने
सदर गुन्हयात सर्व अटक आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम १९९९ (मोक्का) कलम ३(१)(ii),३(२),३(४) अंतर्गत कार्यवाही होणे करीता पोलिस अधिक्षक बच्चन सिंह,अपर
पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उप विभागीय पोलिस अधिकारी सतिष कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज बहुरे पोलिस स्टेशन रामदासपेठ अकोला व पोउपनि शिंदे स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी प्रस्ताव तयार करून विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचे कडे सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावास मान्यता दिल्याने नमुद गुन्हयातील सर्व ०९ आरोपीतांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम १९९९ (मोक्का) अंर्तगत कार्यवाही करण्यात आली आहे.
अकोला पोलिस विभागा मार्फत जिल्हयामध्ये सन २०२२ नंतर प्रथमच मोक्का कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे तसेच संघटीत गुन्हेगारी करणारे गुन्हेगार यांचेवर वचक निर्माण करण्यासाठी नमुद कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे सदर गुन्हयाचा पुढील तपास सतिष कुलकर्णी उप विभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अकोला हे करीत आहे.