Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पहिल्यांदाच इतक्या स्वस्तात मिळत आहे OnePlus 11R; पुन्हा मिळणार नाही अशी डील

9

OnePlus 13R मध्ये 6000mAh ची बॅटरी मिळू अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हा मॉडेल कधी लाँच होईल हे सांगता येत नाही. परंतु जर तुम्हाला वनप्लसचा स्मार्टफोन हवा असेल आणि बजेट 30 हजारांच्या आत असेल तर सध्या OnePlus 11R एक चांगला पर्याय ठरू शकतो. अ‍ॅमेझॉनवर हा मिडरेंज हँडसेट चांगल्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. हा फोन पहिल्यांदाच 30 हजारांच्या आत म्हणजे 27,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे या फोनवर कोणतीही बँक ऑफर नाही परंतु तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी डिस्काउंट मिळवू शकता.

OnePlus 11R चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 11R ची डिजाइन मोठ्याप्रमाणात OnePlus 11 सारखीच आहे. याची बिल्ड देखील चांगली आहे आणि मागील बाजूस मॅट फिनिश मिळते. याची स्क्रीन कर्व्ड आहे जी अनेकांना आवडू शकते कारण ही खूप स्टाइलिश डिजाइन आहे. 11R मध्ये 6.74 इंचाची AMOLED स्क्रीन आहे. हिचे रिजॉल्यूशन 1240 x 2772 पिक्सल आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आहे. उन्हात देखील फोन स्क्रीन नीट दिसावी म्हणून याची ब्राइटनेस 1450 निट्स पर्यंत जाऊ शकते. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आहे जो वेगवान आहे आणि तुमच्या दैनंदिन कामांसाठी पुरेसा आहे जरी हा सर्वात नवीन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर नसाल तरी.
हे देखील वाचा: रेडमी-रियलमीची झोप उडवण्यासाठी OnePlus सज्ज; 16GB RAMसह येऊ शकतो माध्यम किंमतीचा फोन

फोटोग्राफीसाठी OnePlus 11R मधील मेन कॅमेरा चांगला आहे. तुम्ही सहज चांगले फोटो घेऊ शकता. कॅमेरा सेटअपमध्ये 50 MP चा मेन कॅमेरा सेन्सर आहे, सोबत 8 MP ची अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली आहे. तसेच 2 MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. फोनच्या फ्रंटला 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावरबॅकअपसाठी 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 100 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.