Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक प्रेम राशिभविष्य 3 June to 9 June 2024 : संयम ठेवा! पार्टनसोबत नाते घट्ट होईल, प्रेमीयुगुलांसाठी कसा असेल जून महिन्याचा पहिला आठवडा?
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. ग्रहांच्या युतीमुळे प्रेमयुगुलांच्या जीवनात चढ-उतार पाहायला मिळेल. जाणून घेऊया जून महिन्यातील पहिल्या आठवड्याचे साप्ताहिक प्रेम भविष्य
मेष साप्ताहिक प्रेम राशिभविष्य – जोडीदाराला वेळ द्या
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाईल. घरातील व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल. पार्टनरकडे अधिक लक्ष देता येणार नाही. आठवड्यात काही सुधारणा होईल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. युक्तीने केलेल्या संयमामुळे जीवनात शांतता राहिल. प्रेम जीवन रोमँटिक होईल. कुटुंबातील सदस्यांसोबतही चांगला वेळ घालवाल
वृषभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : प्रेम जीवन रोमँटिक होईल

हा आठवडा प्रेमसंबंधांच्या बाबतीत अडचणींनी भरलेला असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला अहंकार बाजूला ठेवा अन्यथा, भांडण वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये परस्पर समंजसपणा वाढेल. प्रेम जीवन रोमँटिक होईल.
मिथुन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल

हा आठवडा प्रेमीयुगुलांसाठी आनंददायी असेल. जोडीदारासोबत समन्वय साधाल त्यामुळे नाते घट्ट होईल. युक्तीच्या जोरावर प्रेम जीवनात आनंद आणू शकाल. परस्पर प्रेम वाढेल. हा आठवडा आनंदाने भरलेला असेल.
कर्क साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : प्रेमसंबंधात निराशा वाढेल.

हा आठवडा सुरुवातीला प्रेम जीवनात सुखद अनुभव देईल. तुमच्या प्रेम जीवनात आनंद येईल. परस्पर समंजसपणाही चांगली राहिल. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. प्रेमसंबंधात निराशा वाढू शकते.
सिंह साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : वाद टाळा

हा आठवडा तुमच्यासाठी प्रेम संबंधांच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. प्रेम जीवनात आनंद दार ठोठावेल. मन थोडे चंचल राहिल. चिंता वाढू शकते. या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये संयम बाळगावा लागेल. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा.
कन्या साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : प्रेमात हट्टीपणा नको

हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. या आठवड्यात कोणतीही समस्या संवादाने सोडवावी लागेल. हट्टीपणाने घेतलेले निर्णय तुमच्या हिताचे नसतील. आठवड्याच्या शेवटी आयुष्यात चढ-उतार येतील पण शेवटी प्रेम संबंधात शांतता राहिल. प्रेम जीवनात आनंदाचे दार ठोठावेल.
तुळ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : प्रेमात संयम ठेवा

हा आठवडा प्रेमसंबंधांच्या बाबतीत चांगला राहिल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते अधिक घट्ट होईल. प्रेम जीवनात दिलेली वचने पूर्ण होतील. नात्यात अहंकार आणू नका, दूरावा येईल. या आठवड्यात रोमँटिक जीवन संयमाने सोडवले तर चांगले होईल. तुमचे जीवन शांततेने भरलेले असेल.
वृश्चिक साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : प्रेमसंबंध दृढ होतील.

हा आठवडा प्रेमीयुगुलांसाठी खास असेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी कुणाची तरी मदत मिळेल. कठोर परिश्रम केल्यास फायदा होईल. निष्काळजीपणा न केल्यास जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होईल.
धनु साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : जोडीदाराशी संवाद साधा

हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत संमिश्र जाईल. प्रेम जीवनात अहंकाराचा संघर्ष वाढू शकतो. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोणतेही बदल किंवा खरेदीबाबत तुमचे मन खट्टू होईल. संवाद साधला तर अनेक समस्या सुटतील.
मकर साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : सुखद अनुभव मिळतील.

हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत आनंदाने भरलेला असेल. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम वाढेल. प्रेम जीवनात आनंद राहिल. स्त्रीच्या मदतीने जीवनात सुखद अनुभव येतील. प्रेमसंबंध घट्ट होतील. प्रेम जीवनाबद्दल अस्वस्थ वाटेल. प्रेमाच्या बाबतीत संयम राखण्याचा प्रयत्न करा.
कुंभ साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : चांगली बातमी मिळेल.

हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. प्रेमात वाढ होईल त्यामुळे सुखद अनुभव मिळतील. प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल. प्रेमी जीवनात आनंद मिळवण्यासाठी एखाद्याकडून मदत मिळू शकते.
मीन साप्ताहिक प्रेम राशिभविष्य : नात्यात आनंद येईल.

हा आठवडा प्रेमात त्रासदायक ठरेल. सुरुवातीला तुमचे मन विचिलित होईल पण लवकरच त्यात आनंद येईल. प्रेम जीवनात वेळ अनुकूल असेल. परस्पर प्रेम देखील दृढ होईल. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा परस्पर संबंधांमध्ये आनंदाने भरलेला असेल.