Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वास्तविक, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मतदारांशी झालेल्या संभाषणाच्या आधारे कुणाचा विजय होईल किंवा कुणाच्या वाट्याला पराभव येईल, याचा अंदाज लावला जातो. २०२४ लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपताच मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे यायला सुरूवात होईल. संध्याकाळी ६ वाजता मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे येतील.
यंदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यास उत्सुक आहे. तर इंडिया आघाडी भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे.
पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी काय झाले होते? त्यावेळी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये साधारण काय चित्र होते? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरले होते. २०१९ मध्ये, बहुतांश एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवली होती. २०१९ मध्ये मतमोजणी झाली तेव्हा अंतिम निकालही थोड्याफार फरकाने सारखेच होते.
एक्झिट पोल एजन्सी | NDA | UPA | Others |
India Todays-Axis My India | 339-365 | 77-108 | 82 |
ABP-CSDS | 277 | 130 | 135 |
C-Voter | 287 | 128 | 127 |
India TV-CNX | 300-310 | 120-125 | 122-130 |
News 24-Todays Chanakya | 350-364 | 95-104 | 97-107 |
News X-Neta | 242 | 164 | – |
Times Now- VMR | 306 | 132 | 104 |
News 18-IPSOS | 336 | 82 | 124 |
India News_Poll Start | 287 | 128 | 127 |
२०१४ आणि १०१९ मध्ये काय झाले होते?
२०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने ५४३ पैकी ३५३ जागा जिंकल्या होत्या. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पूर्ण बहुतमाने सत्तेवर आले होते. एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर २०१४ च्या निवडणुकीत भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे, २०१९ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला केवळ ९१ जागा जिंकण्यात यश आले होते.