Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कट्टर नक्षल खबरी सोमा यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाचे होते १.५ लक्ष रु चे बक्षीस…
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक,त्याचेवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस…..
गडचिरोली(प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे नक्षलवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलिस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्रांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस काल दिनांक 31/05/2024 रोजी अटक केली. गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 79 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उपविभाग अहेरी अंतर्गत उपपोस्टे पेरिमिली हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक, प्राणहिताचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना त्यांना सदर जंगल परिसरामध्ये एक संशयित व्यक्ती फिरत असतांना आढळुन आल्याने विशेष अभियान पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यांनंतर त्याची अधिक सखोल चौकशी केली असता, त्याचे नाव सोमा ऊर्फ दिनेश मासा तिम्मा, वय 23 वर्षे, रा. तोयामेट्टा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.) असे असून, तो कट्टर नक्षल समर्थक व नक्षलवाद्यांचे काम करणारा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सन 2023 रोजी मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलिस आणि नक्षलवादी चकमकीच्या अनुषंगाने पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. 13/2023 कलम 307, 353, 341, 143, 147, 148, 149, 120(ब) भादवि, सह कलम 3,4 भास्फोका सहकलम 3/25, 5/27 भाहका सहकलम 135 मपोका सहकलम कलम 13, 16, 18 (अ), 20 युएपीए अॅक्ट मध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास उपविभागीय पोलिस अधिकारी, हेडरी यांच्या ताब्यात देऊन सदर गुन्ह्रात अटक करण्यात आली.
अधिक तपासात असे दिसून आले की, या आधीसुद्धा तो नक्षलवादी कारवायांमध्ये नक्षलवाद्यांना मदत तसेच नक्षलवाद्यांना राशन पुरवणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, गैर कायदयाची मंडळी जमवुन पोलीसांविरुध्द कट रचने, नक्षलवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता. सदर नक्षलखबरी हा 2020 पासून सदस्य म्हणून काम करीत होता. 2020 पासुन तो गावात राहुन खबरी म्हणून नक्षलवाद्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, नक्षलवाद्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षलवाद्यांना पुरविणे, पोलिस पार्टीबद्दल नक्षलवाद्यांना माहिती देणे तसेच नक्षलवाद्यांची पत्रके जनतेपर्यत पोहचविणे व इतर काम तो करीत होता आतापर्यतच्य्या त्याच्या कार्यकाळात त्याचा 07 गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग होता त्यात मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) येथील आगुळी वडदा नावाच्या एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. सन 2020-21 मध्ये मौजा कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सोनपूर जि. नारायणपूर (छ.ग.) पोलिस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिस जवानांना यश आले होते. 2021 मध्ये मौजा दुरवडा जि. नारायणपूर (छ.ग.) जंगल परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात दोन पोलिस जवान शहिद झाले होते. तसेच एक महिला नक्षलवादी ठार करण्यात पोलिस दलास यश आले होते.
2022 मध्ये मोहंदी जि. नारायणपूर (छ.ग.) गावाजवळील जंगल परिसरात हाकीबोडा पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता 2020-21 मध्ये मौजा कोकामेटा जि. नारायणपूर (छ.ग.) गावातील छोटा पुलियावर झालेल्या ब्लास्टींगमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. यात 04 पोलीस जवान शहिद झाले होते तसेच मौजा मोहंदी व कुतुल जि. नारायणपूर (छ.ग.) रोडवर जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.म्हनुन अशा या जहाल नक्षल समर्थकावर शासनाने जाहिर केले होते बक्षीस. 1.5 लाख रूपयाचे बक्षीस
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक, अहेरी एम. रमेश, पोलिस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक, प्राणहिताच्या जवानांनी पार पाडली