Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Narendra Modi: मतदारांचे आभार तर विरोधकांची धुलाई; एक्झिट पोलनंतर पंतप्रधान मोदींनी दिली मोठी प्रतिक्रिया

11

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडले आणि काही मिनिटांतच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. देशातील विविध वाहिन्या आणि संस्थांमार्फत झालेल्या एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकाद मोदी सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.एक्झिट पोलच्या या अंदाजावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वरून प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ज्यांनी ज्यांनी मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचे मोदींनी आभार मानले आहेत. त्याच बरोबर देशातील लोकांना एनडीए सरकारला पुन्हा निवडून दिल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

एक्झिट पोलच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर एका पाठोपाठ एक पोस्ट शेअर केल्या आहेत. “भारताने मतदान केले आहे! ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्यांचा सक्रिय सहभाग हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. त्यांची वचनबद्धता आणि समर्पण हे आपल्या राष्ट्रात लोकशाहीची भावना फुलते याची खात्री देते. मला भारताच्या नारीचे विशेष कौतुक करायचे आहे. शक्ती आणि युवा शक्ती यांची निवडणुकीत उपस्थिती खूप उत्साहवर्धक आहे,”

पंतप्रधान मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, “मी विश्वासाने सांगू शकतो की भारतातील लोकांनी एनडीए सरकारला पुन्हा निवडून दिले आहे. आमचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमच्या कामाने गरीब, उपेक्षित आणि दलितांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवून आणला आहे. त्याच वेळी, त्यांनी पाहिले की भारतातील सुधारणांनी भारताला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यास प्रवृत्त केले आहे. आमची प्रत्येक योजना कोणत्याही पक्षपात किंवा गळतीशिवाय इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.”


संधिसाधू INDI आघाडी जातीयवादी, जातीयवादी आणि भ्रष्ट आहेत. मूठभर राजघराण्यांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने असलेली ही युती राष्ट्रासाठी भविष्यवादी दृष्टी सादर करण्यात अयशस्वी ठरली. मोहिमेद्वारे त्यांनी केवळ एका गोष्टीवर त्यांचे कौशल्य वाढवले अशा शब्दात मोदींनी फटकारले तसेच असे प्रतिगामी राजकारण जनतेने नाकारल्याचे ते म्हणाले.
Uttar Pradesh Exit Polls: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बंपर लॉटरी; इंडिया आघाडीला मोठा धक्का, एक्झिट पोलचा निकाल जाहीर

निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सध्या कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे गुरुवारपासून ध्यानसाधना करत आहेत. ४ जून रोजी देशातील लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.