Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Uttar Pradesh Exit Polls: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बंपर लॉटरी; इंडिया आघाडीला मोठा धक्का, एक्झिट पोलचा निकाल जाहीर
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला उत्तर प्रदेशमध्ये ६५ जागा मिळाल्या होत्या. बसपाला १० जागा तर सपाला ५ जागांवर विजय मिळवता आला होता. काँग्रेसला फक्त १ जागा मिळाली होती.
दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. याचे कारण म्हणजे या राज्यातील असलेल्या लोकसभेच्या ८० जागा होय. Matrizeच्या एक्झिट पोल नुसार २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश मध्ये बंपर लॉटरी लागणार असल्याचे दिसते. या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला ६९ ते ७४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला ६ ते ११ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्ये बसपला एकही जागा मिळणार नसल्याचे म्हटले आहे. Matrizeनुसार देशात एनडीएला ३५३ ते ३६८ जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज Matrizeने वर्तवला आहे.
Matrizeचा एक्झिट पोल २०२४
भाजप + NDA = ६९ ते ७४
इंडिया आघाडी = ६ ते ११
इंडिया न्यूज डी डायनामिक्सच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ६९ जागा तर इंडिया आघाडीला ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर मुख्यमंत्री योगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या १० वर्षात भारत बदलत आहे. तर गेल्या सात वर्षात डबल इंजिन सरकारने नवा उत्तर प्रदेश पाहायला मिळत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.