Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
AI शिक्षकाने दिली प्रश्नांची उत्तरे
रिपोर्टनुसार, जेव्हा एआय शिक्षिका आयरिसला हिमोग्लोबिन म्हणजे काय असे विचारण्यात आले तेव्हा तिने संपूर्ण तपशीलांसह विद्यार्थ्यांना उत्तर दिले. रॉयल ग्लोबल स्कूल, आसाममध्ये एआय शिक्षक रुजू करण्यात आले आहेत. शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले की AI शिक्षकाने प्रत्येक विषयावरील उदाहरणे आणि संदर्भांसह अभ्यासक्रमाशी संबंधित प्रश्नांची तत्पर उत्तरे दिली.
विद्यार्थ्यांची उत्सुकता
एआय रोबोटकडून प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी विद्यार्थीही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांनीही रोबोटशी हस्तांदोलन केले. रोबोटने ज्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे दिली, ती संपूर्ण प्रक्रिया खूपच मनोरंजक होती. स्कूलमधील एका शिक्षकाने सांगितले की, एआय शिक्षकाकडे त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असल्याने मुले उत्साहित आहेत.
NITI आयोगाने केला आयरिसचा विकास
NITI आयोगाने सुरू केलेल्या अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्पांतर्गत MakerLabs Edu-Tech च्या सहकार्याने ‘Iris’ नावाचा रोबोट विकसित करण्यात आला आहे. शालेय शिक्षक म्हणाले की, आयरिस हे शैक्षणिक क्षेत्रातील AI च्या इंटिग्रेशनमधील महत्त्वपूर्ण प्रगतीचे प्रतीक आहे. या रोबोच्या क्षमतेचा फायदा घेण्यास तयार असल्याचे शाळेचे म्हणणे आहे.
इतर शाळांनाही प्रेरणा
‘आयरिस’ने ईशान्येकडील पहिली शिक्षिका बनून जो विक्रम केला आहे, त्याने इतर शाळांनाही प्रेरणा दिली असेल. येत्या काही दिवसांत असे आणखी रोबो शालेय स्तरावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.