Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बोइंग७७७ या विमानाची वातानुकूलन यंत्रणा बिघडल्यासह अनेक घटक या विलंबाला कारणीभूत होते. मात्र या विलंबामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्यानंतरही एअर इंडियाने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नव्हते. या दीर्घ विलंबाबद्दल कंपनीने शनिवारी माफीनामा जारी केला होता, तसेच विलंबाबद्दल भरपाई म्हणून प्रत्येक प्रवाशाला ३५० अमेरिकन डॉलरचे प्रवास व्हाउचर दिले होते. आधी केंद्र सरकारची मालकी असलेल्या एअर इंडिया या विमान उड्डाण कंपनीचे जानेवारी २०२२मध्ये खासगीकरण करण्यात आले असून ती टाटा उद्योगसमूहाच्या हाती सोपवण्यात आली आहे.
डीजीसीआयची नोटीस
दरम्यान, नागरी हवाई वाहतूक महासंचालयालयाने (डीजीसीए) उड्डाणांना झालेला विलंब आणि प्रवाशांची काळजी घेण्यात आलेले अपयश या मुद्द्यांवरून एअर इंडियाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. ३० मे रोजीचे एआय १८३ दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को आणि २४ मे रोजीचे एआय१७९ मुंबई-सॅनफ्रान्सिस्को या दोन उड्डाणांना झालेल्या प्रचंड विलंबाचा उल्लेख डीजीसीएने या नोटिशीत केला होता.