Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- सदाभाऊ खोत यांचा सरकारवर निशाणा
- सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याने खळबळ
- शरद पवारांवर केली टीका
सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसंच, या सरकारबाबत सूचक इशाराही यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. मिश्किल शब्दांत खोत यांनी सरकारवर टिप्पणी केली आहे.
‘राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला होता. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून सत्ता देखील दिली होती. मात्र लग्न ठरावे, साखरपुडा व्हावा, हळद लागावी आणि अक्षदा पडण्याच्या वेळेतच नवरीने मंडप सोडून पळून जावे अशी स्थिती राज्यात निर्माण झाली. नवरी पळून गेली आणि आमचा मंडप ओस पडला. मात्र, अजूनही आम्ही मंडप मोडलेला नाही अजूनही मंडप सजवून ठेवला आहे. त्यामुळे योग्य वेळी बँड लावून आम्ही अक्षदा टाकू,’ असं सूचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
वाचाः पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, ते गेल्यानंतर…; अजित पवारांची महत्त्वाची प्रतिक्रिया
‘महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आलेले तिघेही हे दरोडेखोर आहेत आणि त्यांनी टी-ट्वेंटसारखे कमी वेळात जेवढे जास्त शासनाची तिजोरी कशी लुटता येईल याचा सपाटा लावलाय, अशी खरमरीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. शिवाय, तिघांचेही द्रोणाचार्य म्हणजे शरद पवार हे बाजूला बसलेले आहेत. शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्यांचा अपमान आहे,’ असे वक्तव्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
वाचाः मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण; अलोट गर्दीमुळं चेंगराचेंगरीसारखी स्थिती