Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दाळंबी येथील वयोवृध्द महीलेवर बलात्कार करणारा फरार आरोपी अखेर बोरगाव मंजू पोलिसांनी घेतले ताब्यात….

9


महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा

दाळंबी येथील वयोवृध्द महीलेवर बलात्कार करणा-या फरार आरोपीस बोरगाव मंजू पोलिसांनी घेतले ताब्यात….

बोरगाव मंजु(अकोला) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस स्टेशन बोरगाव मंजू हददीतील ग्राम दाळंबी ता. जि.अकोला येथे राहणा-या एका वयोवृध्द महीलेने पोलिस स्टेशनला येवून तक्रार दिली की, ती दि. (२८)मे रोजी दुपारी ०२.०० वाजताचे सुमारास अकोला येथून एस टी बसने ग्राम कोळंबी फाटयावर उतरून तेथून प्रायव्हेट लक्झरी बसने तिचे गावी दाळंबी येथे जाण्यास निघाली व दाळंबी गावाचे पुलाच्या अलीकडे उतरली आणि तेथून पायी जात असतांना थोडे दुर अंतरावर तिचे समोरून रोडने दोन मोटर सायकलवर तिघे अनोळखी ईसम आले. एका मोटर सायकलवरील दोन इसमांनी त्यांचे तोंडाला रूमाल बांधुन व एका मोटरसायकल वरील इसमाने काही बांधलेले नव्हते. त्या तिघांनी फिर्यादी वयोव्रुध्द महीलेस उचलून रोडचे बाजुचे लिंबाच्या मळयामध्ये आणले व तोंडाला बांधलेले दोन इमम तेथून निघून गेले, त्या ठिकाणी हजर असलेल्या तिस-या इसमाने फिर्यादी महीलेचे  तोंड दाबून त्यांचे अंगातील लुगडे व ब्लाउज काढून तिचे सोबत जबरीने संभोग केला व कोणाला सांगितले तर मारून टाकणार अशी धमकी दिली,

त्यानंतर त्याने तेथून त्याचे सोबत आलेल्या दोन इसमांना फोन लावला असता ते आले नाही, तेव्हा फिर्यादी महीलेसोबत संभोग केलेला इसम मारण्याकरीता दगड शोधत असतांना फिर्यादी महीलेने तेथून तिचे कपडे घेवून पळून गेली, ती पळून जात असतांना तिला तिचे गावातील धर्मा शिंदे व व त्याचे सोबत एक इसम दाळंबी
गावाकडे पायी जात असतांना दिसले तेव्हा फिर्यादी यांनी धर्मा शिंदे व त्याचे सोबत असलेल्या इसमास तिचे सोबत संभोग करणा-या
इममास पकडा असे म्हटले असता त्यांनी त्याचा  पाठलाग केला असता तो तेथून मोटरसायकल घेवून पळून गेला, फिर्यादी महीलेनी आडोश्याला जाऊन कपडे घातले त्यानंतर त्यांनी फिर्यादीला तिचे घरी नेवून सोडले, अशा फिर्यादी महीलेच्या तोंडी  रिपोर्ट वरुन पोलिस स्टेशनबोरगाव मंजू येथे अप. नं. २८१ / २०२४ कलम ३७६, ३७६ (डी), ५०६, ३४ भादंवि प्रमाणे दाखल करुन तपास सुरु केला

सदर गून्हा हा वयोवृध्द महीलेच्या संदर्भातील व आरोपी अज्ञात असल्या कारणाने त्याचे गांभीर्य ओळखुन पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मुर्तिजापूर, बोरगाव मंजुचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख यांची वेगवेगळी पथके केली. तसेच पोलिस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देवून तांत्रिक विश्लेषणात स्वतः मार्गदर्शन केले. वेगवेगळे पथक सी सी टी व्ही फुटेज व ईतर तांत्रिक बाबींवर तपास करीत असतांना गोपनीय
माहीतीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्हयात वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी राहूल अर्जुन मोरे वय २४ वर्ष रा. ग्राम
शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा यांस ताब्यात घेवून गून्हयासंबंधाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हयाची कबूली दिली असून त्यानं एकटयाने गुन्हा केल्याची कबूली दिली असून सोबत कोणीही नसल्याचे सांगितले व तसे तपासात निष्पन्न झाले आहे.

सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, मुर्तिजापूर  मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, बोरगाव मंजू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज केदारे, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, मनोज उघडे,श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सतीश सपकाळ,सफौ अरूण गोपनारायण, पोहवा योगेश काटकर, गिरीष विर, नारायण शिंदे, पोशि  सचिन सोनटक्के, नितीन पाटील, सुदीप राउत, संदीप पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा अविनाश पाचपोर, रवि खंडारे,
अब्दुल माजिद, वसीम शेख तसेच सायबर सेलचे प्रशांत केदारे व गोपाल ठोंबरे व चालक सफो गोविंदा कूळकर्णी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.