Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकसभा निकालाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, घोषणेकडे लक्ष

8

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतमोजणीच्या एक दिवस आधी निवडणूक आयोग महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. आज, सोमवार ३ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता निवडणूक आयोग नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधणार आहे. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात निवडणूक आयोगाने निकालावर पत्रकार परिषद बोलावण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

१९ एप्रिलपासून सुरू झालेल्या सात टप्प्यातील निवडणुका एक जून रोजी संपल्या. “सार्वत्रिक निवडणुका २०२४ वर भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद” असे आयोगाने माध्यमांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.

दरम्यान, उद्या मंगळवार, ४ जून रोजी सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचे आकडे समोर येतील. त्यानंतर प्रत्येक फेरीला २२ मिनिटे लागणार असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Sansad Bhavan : संसद सुरक्षा यंत्रणेत विचित्र अस्वस्थता, PSS कर्मचाऱ्यांना नोकरीची चिंता
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान तीन प्रकारच्या पोस्टल बॅलेटची मोजणी करण्यात येणार आहे. सैनिकांना इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम (ईटीपीबीएस) नुसार ऑनलाइन मतपत्रिका पाठवण्यात आलेल्या. मंगळवारी सकाळी ७ वाजेपर्यंत या मतपत्रिका स्वीकारण्यात येतील.

याशिवाय मतदानाच्या दिवशी मतदारसंघात नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या केंद्रांवर ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान केले. यासाठी पोस्टल बॅलेटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. या मतांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्या पोस्टल मतांची तपासणी आधी करण्यात येईल.
BJP President : नड्डांनंतर बावनकुळेंचाही नंबर? भाजप प्रदेशाध्यक्षपद बदलण्याचे संकेत, केंद्रीय राज्यमंत्र्याचं नाव चर्चेत
एका टेबलवर ५०० मतपत्रिकांप्रमाणे गरजेनुसार टेबलची व्यवस्था केली जाईल. पात्र-अपात्र मतपत्रिकांची निवड करणे, त्यानंतर पात्र मतपत्रिका उघडून संबंधित उमेदवारांच्या रकान्यात जमा करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष पोस्टलच्या मतमोजणीला सुरुवात होईल, त्यामुळे या प्रक्रियेला उशीर होईल, असे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत, उपनिवडणूक आयुक्त मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर मीडिया ब्रीफिंग्ज घेत असत, परंतु ही प्रथा रद्द करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोगाने बारासात आणि मथुरापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका बूथवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.