Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Loksabha Election Result: देशाच्या बहुप्रतिक्षित निकालासाठी उरले काही तास, निकालापूर्वी केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दिली मोठी अपडेट

10

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूकीसाठीची सर्व टप्प्यांतील मतदान पार प्रक्रिया पार पडली आहे. देशभरात यंदा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांत ७ टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. ५४३ मतदारसंघांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता उद्याच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मंगळवार ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचे आकडे समोर येतील. त्यानंतर प्रत्येक फेरीला २२ मिनिटे लागणार असल्याचे केंद्रीय निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

निकालाच्या आदल्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी मतदानाची टक्केवारी मांडली आहे. देशात एकूण ६४.२ कोटी मतदारांनी मतदानात सहभाग नोंदवला आहे. ज्यामध्ये ३१.२ कोटी महिलांचा समावेश आहे. यंदा महिलांचा सहभाग उल्लेखनीय असल्याने आयुक्तांनी महिलांचे कौतुक केले आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना आयुक्त पुढे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेत ६८,००० हून अधिक नियंत्रण पथक आणि दीड कोटी मतदान व सुरक्षा कर्मचारी सामील आहेत. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे चार लाख वाहने, १३५ विशेष गाड्या आणि १६९२ हवाई उड्डाणांचा वापर करण्यात आला

दरम्यान २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये २०१९ मधील ५४० फेरमतदानाच्या तुलनेत केवळ ३९ जागांवर फेरमतदान झाल्याचे कुमार यांनी अधोरेखित केले आहे.

इथे पाहता येणार निकाल

विधानसभा मतदारसंघ तसेच लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी/सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी नोंद केलेल्या आकडेवारीनुसार मतमोजणीचे निकाल समोर येणार आहेत. https://results.eci.gov.in/ या केंद्रीय निवडणूक आयोगाची वेबसाइटवर तसेच मतदार हेल्पलाइन ॲप, iOS आणि अँडड्रॉइड मोबाईल ॲप्सवर निकाल पाहता येणार आहेत.

तर रिटर्निंग अधिकारी आणि मतमोजणी प्रतिनिधींसाठी हँडबुक पुढील वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे

https://tinyurl.com/yknwsu7r and https://tinyurl.com/mr3cjwhe

दरम्यान गुगल प्ले किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून नागरिकांना व्होटर हेल्पलाइन ॲप डाउनलोड करता येणार आहे. यामध्ये असलेल्या फिल्टर्सचा वापर करुन मतदारसंघनिहाय किंवा राज्यनिहाय विजयी, आघाडीवर किंवा पिछाडीवर असलेल्या उमेदवारांचे तपशील नागरिकांना पाहता येणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.