Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sonia Gandhi : धक्कादायक निकालासाठी तयार राहा… मतमोजणीआधी सोनिया गांधींचं मोठं वक्तव्य

11

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधी यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं, की ४ जून रोजी धक्कादायक निकालांसाठी तयार राहा. इंडिया आघाडीने सर्व एक्झिट पोल खोटे ठरवून विजयाचा दावा केला आहे. उद्या २९५ पेक्षा जास्त जागा मिळतील असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे. सोनिया गांधी यांच्याआधी राहुल गांधी यांनीही २९५ जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली होती.

एक्झिट पोलचे अंदाज आणि उद्या ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीबद्दल त्यांचं मत विचारलं असता, सोनिया गांधी म्हणाल्या, ‘आपल्याला फक्त वाट पाहावी लागेल. विशेष म्हणजे, बहुतांश एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
त्याआधी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्झिट पोलला मानसशास्त्रीय खेळ म्हणत एक्झिट पोल आणि ४ जून रोजी येणारे निकाल यात खूप फरक असेल, असंही म्हटलं.
Ratnagiri Sindhudurg News : रत्नागिरी – सिंधुदुर्गमध्ये कोण मारणार बाजी? राणेंचा विजय की राऊतांच्या विजयाची हॅट्रिक?
मोदी ज्यांना ४ जूनला नक्की जावं लागेल, त्यांनी हे सर्व नियोजन करून एक्झिट पोल मॅनेज केले आहेत. एक्झिट पोल आणि ४ जूनचे निकाल यात मोठी तफावत असणार आहे. काल इंडिया आघाडीची बैठक झाली, आम्ही आकड्यांवर सविस्तर चर्चा केली, इंडिया आघाडीला २९५च्या खाली मिळणं अशक्य आहे, असंही जयराम रमेश यांनी म्हटलं होतं.

दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नावर गंमतीने एक उत्तर दिलं. तुम्ही सिद्धू मूसेवालाचं २९५ हे गाणं ऐकलं आहे का? मीडियाने हो म्हणताच ते म्हणाले की फक्त तोच नंबर येत आहे.

इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३६१-४०१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया ब्लॉक १३१-१६६ जागा मिळण्याची तर इतर पक्षांना ८ ते २० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रिपब्लिक पीएमर्क एक्झिट पोलमध्ये ५४३ जागांपैकी एनडीएला ३५९ जागा, इंडिया ब्लॉकला १५४ जागा आणि इतर ३० असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिपब्लिक मॅट्रिस पोलने एनडीएला ३५३-३६८ जागा, इंडिया ब्लॉकला ११८-११३ जागा आणि इतरांना ४३-४८ जागा दिल्या आहेत. न्यूजएक्स डायनॅमिक्सने एक्झिट पोलमध्ये एनडीएला ३७१ जागा, इंडिया ब्लॉकला १२५ जागा आणि इतरांना ४७ जागा दिल्या आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.