Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Fact Check : लोकसभा निकालानंतर राहुल गांधी थायलंडला जाणार? व्हायरल फोटोचं सत्य काय?

9

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका संपल्या असून आता सर्वांनाच ४ जून निकालाची प्रतिक्षा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या थायलंड आणि बँकॉक जाण्याचा दावा केला जात आहे. मात्र बूमने केलेल्या तपासात हा दावा पूर्णपणे बनावट असल्याचं समोर आलं आहे.

फेसबुकवर एका युजरने एका तिकीटाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत युजरने लिहिलंय, की राहुल गांधींनी ५ जूनचं तिकीट बुक केलं आहे. इथे पाहा अर्काइव पोस्ट.

या फेसबुक युजरशिवाय आणखी एका युजरने एक्सवर तिकीटाचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. अर्काइव पोस्ट.

fact check

fact check

Fact Check : बनावट डॉक्टरांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याचा दावा व्हायरल, काय आहे सत्य?

सत्य कसं समोर आलं?

बूमने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या तिकिटाची पडताळणी केली. या पडताळणीत तिकिटावर दोन ठिकाणी वेगवेगळे फ्लाइट नंबर लिहिलेले आढळून आले. एका ठिकाणी UK121 तर दुसऱ्या ठिकाणी UK115 लिहिलं होतं. बूमने आणखी तपास करत रिव्हर्स इमेज सर्चद्वारे फोटो शोधले. यात त्यांना २०१९ मध्ये Live From A Lounge नावाच्या वेबसाइटवर अपलोड केलेला लेख सापडला. यात तिकिटावर अजय अवतानी असं प्रवाशाचं नाव लिहिलं होतं. यात दिल्ली ते सिंगापूर प्रवासाची तारीख ६ ऑगस्ट २०१९ लिहिली होती.

fact check

दोन्ही फोटो फरक ….

fact check

यानंतर, बूमच्या टीमने त्या लेखाचे लेखक आणि Live from a Lounge चे संस्थापक आणि संपादक अजय अवतानी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं, की त्यांच्या तिकिटाचा फोटो २०१९ च्या लेखात शेअर करण्यात आला होता. ते विस्ताराचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय विमान होतं आणि मी त्यात बसलो होतो. ज्याने हा फोटो एडिट केला आहे तो दोन ठिकाणी लिहिलेल्या फ्लाइट नंबरपैकी एका ठिकाणी बदलण्यास विसरला असल्याचं दिसतंय, असंही ते म्हणाले.

खर्गे ते राहुल गांधी, एक्झिट पोलनंतरही २९५ जागांचा दावा

निष्कर्ष

बूमच्या पडताळणीत राहुल गांधी यांच्या नावाने व्हायरल होणारं थायलंड आणि बँकॉकचं तिकीट बनावट असल्याचं आढळून आलं. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी खोट्या प्रचारासाठी तिकीट एडिट करून शेअर केलं जात आहे.

(This story was originally published by Boom, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.