Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
CSUSB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट केले की नितीशा ही अखेरची लॉस एंजेलिसमध्ये दिसली होती आणि ३० मे रोजी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस प्रमुख जोन गुटेरेझ येथे नोंदवली गेली.
पोलिसांनी नितीशाच्या शोधासाठी आता सामान्य नागरिकांची मदत मागितली आहे. “बेपत्ता व्यक्ती सीएसयूएसबीची विद्यार्थिनी नितीशा कंदुलाबद्दल कोणाकडे माहिती असेल, तर त्यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, सॅन बर्नार्डिनो पोलिस आणि आमचे सहकारी लॉस एंजेलिस पोलीस विभागाला माहिती द्यावी”. माहिती देऊ शकतील त्यांच्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.
शिकागोमधील भारतीय विद्यार्थीही बेपत्ता
गेल्या महिन्यात शिकागो येथील २६ वर्षीय भारतीय विद्यार्थी रुपेश चंद्रा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. यापूर्वी मार्च महिन्यापासून बेपत्ता असलेला २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी मोहम्मद अब्दुल अराफात अमेरिकेतील क्लीव्हलँडमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.
हैदराबादचा रहिवासी असलेला अराफत गेल्या वर्षी मे महिन्यात क्लीव्हलँड विद्यापीठात आयटीमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत आला होता.
तर, मार्चमध्ये ३४ वर्षीय प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना अमरनाथ घोषची सेंट लुईसच्या मिसुरी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर २ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमधील एका रेस्टॉरंटबाहेर ४१ वर्षीय विवेक तनेजा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे भारतीय लोक हे विदेशात किती सुरक्षित आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.