Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खोदकामादरम्यान असं काही सापडलं की सारे हादरले, ८० वर्षांपूर्वीचं धडकी भरवणारं रहस्य उघड

5

मुंबई: जमिनीचं खोदकाम करताना अनेकदा अशा काही गोष्टी सापडतात जे पाहून पुरातत्व शास्त्रज्ञांनी धक्का बसतो. अनेकदा खोदकामात खजिना ही सापडतो. पण, पोलंडच्या एका छोट्याशा शहराजवळ शेतात खोदकामादरम्यान असं काही सापडलं की साऱ्यांना धडकी भरली. यावेळी ८० वर्षांपूर्वीचं असं रहस्य समोर आलं आहे, ज्याबाबत आपण कधी कल्पनाही केली नसेल. स्थानिकांनाही विश्वास होत नाहीये की इतक्या वर्षांपासून या शेतात असं काही असेल.

हे प्रकरण पोलंडच्या चोजनिस शहरातील आहे. येथे खोदकामादरम्यान पुरातत्व शास्त्रज्ञांना एक सामूहिक कबर सापडली आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी लोकांनी १०० पेक्षा जास्त लोकांवर एकत्र गोळीबार करण्यात आला होता. तसेच, त्यांचे मृतदेह याच ठिकाणी दफन करण्यात आले होते. याच कारणामुळे पुरातत्व शास्त्रज्ञ याला डेथ वॅली म्हणतात. ज्या लोकांना गोळी झाडून मारण्यात आलं ते सगळे मनोरुग्ण होते. त्यांना ऑक्टोबर १९३९ च्या अखेरीस जर्मन अधिकाऱ्यांनी गोळी झाडली.

ही मनोरुग्ण व्यक्तींची कबर आहे, जगात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मनोरुग्णांची कबर सापडली आहे. यापैकी अनेक असे होते ज्यांच्या शरीरावर कपडे नव्हते. त्यांनी फक्त पँट घातलेली होती. कबरमध्ये फक्त एक बटण सापडलं. त्यांचं कुठलं सामानही यात सापडलं नाही. पण, मृतदेहांच्या बाजुला खोके आणि अनेक गोळ्या सापडून आल्या.

पुरातत्व शास्त्रज्ञांनी सांगितलं की आम्ही आतापर्यंत कबरचा अर्धाच भाग खोदू शकलो आहोत. ऐतिहासिक आकड्यांनुसार काहीच दिवसात येथे २१८ जणांना मारण्यात आलं होतं आणि त्यांच्या मृतदेहांना कबरमध्ये लपवण्यात आलं होतं.

१९३९ मध्ये पोमेरेनिया येथे अनेक ठिकाणी मनोरुग्णांची हत्या करण्यात आली होती. पण, १९४४ मध्ये यापैकी अनेक ठिकाणं नष्ट करण्यात आलं. जेव्हा जर्मन लोकांनी कबर आणि मृतदेहांना काढलं तेव्हा त्यांनी इतर गोष्टींसोबतच या मृतदेहांनाही जाळून टाकलं. सध्या ही एकमात्र सामूहिक कबर वाचलेली आहे.

जर्मन तानाशाह एडोल्फ हिटलरला मनोरुग्णांचा द्वेष होता. त्यामुळे ऑक्टोबर १९३९ मध्ये त्याने अभियान शुरु केला, ज्याचं नाव अॅक्शन टी-४ ठेवण्यात आलं. तेव्हा मनोरुग्णांची हत्या करण्यात आली. याला अनैच्छिक इच्छामृत्यूही म्हटलं जातं. त्यानंतर सप्टेंबर १९३९ मध्ये जेव्हा हिटलरने पोलंडवर कब्जा केला तेव्हा तिथेही सामूहिक हत्या केल्या.

तपास करणाऱ्या आंद्रेज पोजोरस्की यांनी सांगितलं की, काही कवट्यांवर आम्हाला गोळ्यांच्या खुणा दिसून आल्या. त्या कवटीतून आरपार झाल्या होत्या. सध्या अवशेषांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुराव्यांवरुन असं दिसून आलं की ऑक्टोबर १९३९ च्या अखेरीस त्यांना इथे आणण्यात आलं आणि गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर मृतदेहांना दफन करण्यात आलं आणि जमीन एकसारखी करण्यात आली, जेणेकरुन कोणी याचा शोध लावू शकू नये.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.