Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

South Africa Election: दक्षिण आफ्रिकेत अनपेक्षित निकाल; आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेसने ३० वर्षांनी गमावले बहुमत

3

वृत्तसंस्था, जोहान्सबर्ग : गौरवर्णीय लोकप्रतिनिधींची मक्तेदारी मोडून काढत वर्णभेदाविरुद्धचा प्रदीर्घ लढा जिंकणाऱ्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (एएनसी) पक्षाने दक्षिण आफ्रिकेच्या संसदेतील बहुमत गमावले आहे. देशात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील मतमोजणीत हे चित्र स्पष्ट झाले. ‘एएनसी’ने १९९४पासून सलग तीस वर्षे आफ्रिकी संसदेत बहुमत राखले होते. सत्तास्थापनेसाठी पक्षाला अन्य पक्षांशी आघाडी करावी लागणार आहे.

‘एएनसी’ने १९९४मध्ये नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. यानंतर आजतागायत याच पक्षाने सत्ता राखली होती. यंदाच्या निवडणुकीत बुधवारी मतदान झाले होते. शनिवारी उशिरापर्यंत ९९ टक्के मतमोजणी पूर्ण झाली. यात ‘एएनसी’ला ४० टक्के मते मिळाल्याचे दिसून आले. बहुमताच्या तुलनेत हे संख्याबळ फार कमी असल्याने पक्षाने सत्ता गमावल्याचे शनिवारीच स्पष्ट झाले. मतमोजणीचा अधिकृत निकाल जाहीर होणे बाकी आहे.

विरोधी पक्षांनी या निकालाचे स्वागत केले. गरिबी व आर्थिक विषमतेच्या गर्तेत अडकलेल्या देशाला सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने हे निकाल कलाटणी देणारे ठरतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत्यांनी दिली. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ‘एएनसी’ला आता काही पक्षांशी आघाडी करावी लागेल. या वाटाघाटी यशस्वी झाल्या तरच ‘एएनसी’ची सत्ता येईल व विद्यमान अध्यक्ष सीरिल रामाफोसा यांची फेरनियुक्ती होऊ शकेल, असे राजकीय अभ्यासकांनी म्हटले आहे.
Maharashtra Lok sabha Election Exit poll : ठाकरे देणार दणका, महायुतीची झोप उडविणारा Exit poll
बेरोजगारी ३२ टक्क्यांवर

दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या ६.२ कोटी असून यात कृष्णवर्णीयांचे प्रमाण सुमारे ८० टक्के आहे. आफ्रिका खंडातील इतर देशांच्या तुलनेत या देशाची स्थिती बरी असली तरी तेथील बेरोजगारीचा दर ३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. बेरोजगारी व गरिबी याची सर्वाधिक झळ कृष्णवर्णीयांना बसत असून, ते ‘एएनसी’चे समर्थक मानले जातात.

– अन्य पक्षांपैकी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या डेमोक्रॅटिक अलायन्सला २१ टक्के मते
– एमके पक्षाने १४ टक्के मते प्राप्त केली आहेत
– ‘एएनसी’शी फारकत घेतल्यानंतर आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांच्याकडून एमके पक्षाची स्थापना
– एमके पक्षाने प्रथमच निवडणूक लढवली. यापैकी कोणीही ‘एएनसी’शी आघाडी करण्याचे संकेत अद्याप दिलेले नाहीत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.