Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok Sabha Election Result: तुरुंगातून निवडणूक लढवूनही विजय; एक तर इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा, कोण आहेत हे उमेदवार?

13

नवी दिल्ली : देशातील दोन उमेदवार सध्या तुरुंगात असूनही त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. पंजाबमधून अपक्ष निवडणूक लढवलेला अमृतपालसिंग, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला मतदारसंघातून इंजिनीअर रशीद हा अपक्ष उमेदवार यांनी विजयी आघाडी घेतली आहे.

अमृतपालसिंग हा खलिस्तानी समर्थक आहे. त्याच्या चिथावणीवरून पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी त्याला सध्या आसाममधील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याने पंजाबमधील खडूरसाहिब मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुलबीरसिंग झिरा यांच्यावर एक लाख ९७ हजार १२० मतांची विजय मिळवला. अमृतपालसिंग ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आहे. १८ मार्च २०२३ रोजी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. मात्र, २३ मार्च २०२३ रोजी त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात १२ फौजदारी खटले आहेत.

इंजीनिअर रशीद म्हणून ओळखला जाणारा अब्दुल रशीद शेख हादेखील फुटीरतावादी आहे. त्याने बारामुल्ला मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार उमर अब्दुल्ला यांच्यावर दोन लाख चार हजार १४२ मतांनी मात केली. रशीद सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे. रशीद टेरर फंडिंग प्रकरणी २०१९पासून तुरुंगात आहे. त्याला गेल्या निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघात एक लाख मते मिळाली होती. मात्र, तो तिसऱ्या स्थानी होता. यंदाच्या निवडणुकीत तो जम्मू-काश्मीरमधील एकमेव लक्षवेधी अपक्ष उमेदवार होता.
Lok Sabha Results: धैर्यशील मानेंनी ‘धैर्या’ने खेचून आणला विजय; २ वेळा खासदार राहिलेल्या राजु शेट्टींवर ओढावली नामुष्की
इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा विजयी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मारेकरी बेअंतसिंग याचा मुलगा सरबजितसिंग खालसा हा पंजाबमधील फरीदकोट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला. त्याने आम आदमी पक्षाचे करमजितसिंग अनमोल यांच्यावर ७० हजार ५३ मतांनी मात केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.