Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok sabha Result 2024 : नितीशकुमार यांच्यापेक्षा चांगला पंतप्रधान कोण असेल; असे म्हणत जेडीयूचा एनडीएवर दबाव

7

पटना – लोकसभा निवडणूक 2024 चा संपूर्ण निकाल जवळपास लागला आहे. यावेळी एनडीए पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करत असल्याचे दिसत असले तरी भाजप 272 चा आकडा गाठण्यात अपयशी ठरला आहे. यानंतर एनडीएचा मित्रपक्ष नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीवर अवलंबित्व वाढले आहे. अशातच आता जेडीयूकडून दबावाचे राजकारण सुरू करण्यात आले आहे. जेडीयूचे आमदार खालिद अन्वर यांनी पंतप्रधान पदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

नितीशजी यांच्यापेक्षा चांगला पंतप्रधान कोण असेल

पत्रकार परिषदेमध्ये जेडीयू चे आमदार खालिद अन्वर यांना पंतप्रधान पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना अन्वर म्हणाले की, ”नितीश कुमार यांच्यापेक्षा चांगला पंतप्रधान कोण असू शकतो? नितीशकुमार हे समाज आणि देश समजून घेणारे अनुभवी राजकारणी आहेत. ते सर्व लोकशाही संस्थांचा आदर करतात. आम्ही आता एनडीए आघाडीचा भाग आहोत, परंतु आजही लोकांना नितीश कुमार पंतप्रधान व्हावेत असे वाटते. आजच्या निकालानंतर लोकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.” असे म्हणत जेडीयूकडून कळत न कळत एनडीएवर दबाव टाकला जात असल्याचं बोललं जात आहे.
Lok Sabha Election Result 2024: अब की बार महत्प्रयासानं नय्या पार; भाजपची आता N फॅक्टरवर मदार; ‘ते’ दोघे काय करणार?

पवारांकडून नितीश कुमारांना उपपंतप्रधानाची ऑफर?

दरम्यान, भाजपला यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे घटक पक्षांची मदत घेऊन जागांची जुळवा जुळव करावी लागणार असून त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच बरोबर इंडिया आघाडीला जर सत्तेत यायचं असेल तर त्यांना आणखी जागांची गरज आहे. अशातच शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन करून उप पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची बातमी समोर आली होती. परंतु शरद पवार यांनी ती बातमी खोटी असल्याचं सांगितले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.