Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Acer TravelMate P6 14, Travelmate P4 Exclusive, Chromebook Plus Spinची किंमत
Acer TravelMate P6 14 ची किंमत 1,429 डॉलर्स (अंदाजे रु. 1,19,200) पासून सुरू होते तर TravelMate P4 Spin 14 मॉडेलची किंमत 1,329 डॉलर्स (अंदाजे रु. 1,10,900) पासून सुरू होते. TravelMate P4 16 आणि TravelMate P4 14 ची किंमत 1,229 डॉलर्स (अंदाजे रु. 1,02,500) आणि 949 डॉलर्स (अंदाजे रु. 79,200) आहे. हीच मॉडेल्स जुलैमध्ये उत्तर अमेरिकेत आणि २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिकेत विक्रीसाठी आणली जातील.
Acer Chromebook Plus Spin 514 ची किंमत 549 डॉलर्स (अंदाजे रु. 45,800), तर Chromebook Plus Enterprise 515 आणि Chromebook Plus Enterprise Spin 514 ची किंमत 649 डॉलर्स (अंदाजे रु. 54,200) आणि 749 डॉलर्स (अंदाजे रु. 62,500) आहे. काही मॉडेल्स ऑगस्टमध्ये उत्तर अमेरिकेत विक्रीसाठी आणली जातील, तर ते जुलैपर्यंत मिडल इस्ट सारख्या बाजारपेठेत विक्रीसाठी जाण्याची शक्यता आहे.
Acer TravelMate P6 14, Travelmate P4चे डिटेल्स
ट्रॅव्हलमेट पी सीरीज मॉडेल्स इंटेल कोअर अल्ट्रा 7 प्रोसेसरने सुसज्ज आहेत. ज्यामध्ये फक्त इंटेल ग्राफिक्स उपलब्ध आहेत. यात 64 जीबीपर्यंत रॅम देण्यात आली आहे. शिवाय त्यात TravelMate P4 14 AMD Ryzen 7 Pro 8840U चिपसेट आहे आणि AMD Radeon 780M ग्राफिक्स प्रोसेसर आहे.
Acer TravelMate P6 14 आणि TravelMate P4 Spin 14 मध्ये अनुक्रमे 14-इंचाचा WQXGA (2,880×1,800 pixels) OLED डिस्प्ले आणि 14-इंचाचा WUXGA (1,920×1,200 pixels) IPS डिस्प्ले आहे. TravelMate P4 14 आणि TravelMate P4 16 मध्ये WUXGA (1,920×1,200 पिक्सेल) रिझोल्यूशनसह 14-इंच आणि 16-इंच IPS डिस्प्ले आहेत.
या लॅपटॉपमध्ये 65Wh बॅटरी आहे. ज्यासाठी कंपनीचा दावा आहे की ती 14 तासांचा बॅकअप देऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi 7 आणि ब्लूटूथ 5.3 साठी सपोर्ट आहे. डिव्हाइसेसमध्ये 2 थंडरबोल्ट 4 आणि HDMI 2.0 पोर्ट देखील आहेत. स्टोरेजसाठी, ते 1TB पर्यंत NVMe प्रकारच्या स्टोरेज क्षमतेस सपोर्ट करत्ते.
Acer Chromebook Plus Spin सिरीज डिटेल्स
Acer Chromebook Plus मध्ये Intel Core 7 प्रोसेसर आहे. यामध्ये 16 GB पर्यंत रॅम आहे. Acer Chromebook Plus Spin 514 आणि Chromebook Plus Enterprise Spin 514 मध्ये 128 GB स्टोरेज आहे, तर Chromebook Plus Enterprise 515 मध्ये 512 GB NVMe स्टोरेज आहे.
Spin 514 आणि Enterprise Spin 514 मध्ये 14-इंचाचा WUXGA (1,920×1,200 pixels) IPS डिस्प्ले आहे. तर Enterprise 515 मध्ये 15.6-इंचाचा फुलएचडी (1,920×1,080 पिक्सेल) IPS डिस्प्ले आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, यात Wi-Fi 6E आणि ब्लूटूथ 5.2 साठी सपोर्ट आहे. यात दोन USB Type-C पोर्ट, एक USB 3.2 Gen 1 Type-C पोर्ट आणि एक HDMI 1.4 पोर्ट आहे. तिन्ही मॉडेल्समध्ये 53Wh बॅटरी आहे. जे एका चार्जमध्ये 10 तासांचा बॅकअप देऊ शकतात.