Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vat Purnima 2024 Tithi :
जून महिना सुरु झाला की, पावसाला सुरुवात होते. हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरु होतात. ज्येष्ठ महिना आली की, स्त्रियांना वेध लागतात ते वटपौर्णिमेचे.
आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. यंदा ही वटपौर्णिमा २१ जून ला साजरी केली जाणार आहे.
वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखले जाते. हा सण महाराष्ट्र, उत्तर भारत, नेपाळ, गोवा, गुजरात आणि पश्चिम भारतातील विविध राज्यात विवाहीत महिला साजरा करतात. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सात जन्म हाच नवरा मिळू देत असे वचन देखील मागतात. जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत
1. वटपौर्णिमा २०२४ तिथी
यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी २१ जून रोजी आहे. त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील. पौर्णिमा तिथी २१ जूनला सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल आणि २२ जूनला संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी संपेल.
2. वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त
वडाच्या झाडाला पूजण्यासाठी २१ जून रोजी सकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.
3. विवाहित महिला वडाच्या झाडाला का पूजतात?
पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे सत्यवानचे प्राण परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात. तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.
4. वट सावित्रीचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो असे म्हटले जाते. कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते असे सांगण्यात आले आहे. वडाचे झाड हे धार्मिक रित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीयदृष्ट्या. वडाचे झाड १०० वर्षापेक्षा जास्त काळ जगते. त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पूजतात. तसेच वडाच्या झाडाखाली जैन तीर्थंकर ऋषभदेव यांनी तपश्चर्या केल्याचे मानले जाते.
5. वटपौर्णिमा पूजा पद्धत
- वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करुन १६ श्रृंगार परिधान करावे.
- व्रताचे संकल्प करुन पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा.
- वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले, अक्षता, मिठाई, फणस, करवंद, जांभूळ , आंबा, हळदी-कुंकू यांसारखे गोष्टी ठेवा.
- वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून ७ वेळा प्रदिक्षिणा मारा.
- पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा.
- विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.