Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तुमचा पक्ष जिंकला नाही म्हणून ट्रोल होताय का? अशाप्रकारे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ब्लॉक करा ट्रॉलर्सना
चला जाणून घेऊया फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर कशाप्रकारे लोकांना ब्लॉक करू शकता. तसेच अनब्लॉक करण्याची देखील पद्धत पाहू.
Facebook युजरला ब्लॉक कसे करायचे
फेसबुक युजरला ब्लॉक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- युजरच्या अकॉऊंटवर जा
- कव्हर फोटोच्या खाली उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा
- एक मेन्यू ओपन होईल त्यात “Block” वर क्लीक करा.
Facebook युजरला अनब्लॉक कसे करायचे
फेसबुक युजरला अनब्लॉक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- सर्वप्रथम फेसबुक अॅपमध्ये उजवीकडे वरच्या बाजूला तुमच्या प्रोफाइल फोटोवर क्लिक करा
- खाली स्क्रोल डाऊन करून “Setting & Privacy” वर क्लिक करा.
- त्यानंतर पहिल्याच ऑप्शन “Setting” वर क्लीक करा.
- खाली स्क्रोल करून “Blocking” वर क्लिक करा.
- इथे तुम्हाला तुमची ब्लॉक लिस्ट दिसेल.
- ज्या युजरला अनब्लॉक करायचं आहे त्याच्या नावासमोर असलेल्या “Unblock” बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर पुन्हा एकदा “Unblock” वर क्लिक करून कन्फर्म करा.
Instagram युजरला कसं करायचं ब्लॉक
इंस्टाग्राम युजरला ब्लॉक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- मोबाइलवरून इंस्टाग्राम अॅपमध्ये लॉगइन करा.
- ज्या युजरला ब्लॉक करायचं आहे त्याच्या अकाऊंटवर जा.
- उजवीकडे वरच्या बाजूला असेलल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- त्यानंतर “Block” वर क्लिक करा.
- त्यानंतर आलेल्या पॉप अप मेन्यूमध्ये “Block” वर क्लिक करून कन्फर्म करा.
Instagram युजरला अनब्लॉक कसं करायचं
इंस्टाग्राम युजरला अनब्लॉक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- इंस्टाग्राम अॅपमध्ये तुमच्या प्रोफाइल पेजवर जा.
- उजवीकडे वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
- थोडं खाली स्क्रोल करून “Blocked” वर क्लिक करा.
- इथे तुम्हाला तुम्ही ब्लॉक केलेल्या युजर्सची यादी दिसेल.
- ज्याला अनब्लॉक करायचं असेल त्याच्या नावासमोर असलेल्या “Unblock” बटनवर क्लिक करा.
X (Twitter) युजरला कसं ब्लॉक करायचं?
X (Twitter) युजरला ब्लॉक करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:
- ज्या युजरला ब्लॉक करायचं आहे त्याच्या अकाऊंटवर जा.
- कव्हर फोटोच्या उजवीकडे असेलल्या तीन डॉटवर क्लिक करा
- त्यानंतर “Block” वर क्लिक करा
- त्यानंतर समोर आलेल्या पॉप अप मेन्यू “Block” वर क्लिक करून कन्फर्म करा.
X (Twitter) युजरला अनब्लॉक कसं करायचं?
- होम पेजवर डावीकडे वरच्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल फोटोक्लिक करा.
- त्यानंतर खाली “Setting and privacy” वर क्लिक करा.
- समोर आलेल्या मेन्यूमधून “Privacy and safety” ची निवड करा.
- त्यानंतर “Mute and Block” वर क्लिक करा.
- त्यानंतर “Blocked accounts” वर क्लिक करा.
- समोर एक लिस्ट येईल.
- ज्याला अनब्लॉक करायचं त्याच्या नावासमोर “Blocked” वर क्लिक करून अनब्लॉक करा.