Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Jammu Kashmir Election 2024 Result: जम्मू-काश्मीरमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव, जनमत कुणाच्या पारड्यात?

13

वृत्तसंस्था, श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांना जनतेने नाकारले. राज्यात मंगळवारी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणूक निकालात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांचा पराभव झाला. मुख्य म्हणजे तुलनेने अपरिचित अशा उमेदवारांनी त्यांना पराभूत केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जम्मू आणि उधमपूरची जागा भारतीय जनता पक्षाने मिळविल्या.

अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून गुज्जर नेते आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मियॉं अल्ताफ अहमद यांनी मुफ्ती महेमुद यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला. बारामुल्ला मतदारसंघातून माजी आमदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनीअर रशिद यांनी ‌ओमर अब्दुल्ला यांचा पराभव केला. पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन यांनाही नागरिकांनी नाकारले.

प्रतिष्ठित श्रीनगर मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आगा रूहल्ला मेहदी यांनी ‘पीडीपी’चे युवा आघाडीचे अध्यक्ष वाहीद पारा यांचा पराभव केला. ‘कलम ३७० हटविण्याच्या विरोधात मी लोकसभेत जनतेच्या भावना व्यक्त करणार आहे,’ असे मेहदी यांनी विजयानंतर सांगितले.

दरम्यान, अब्दुल्ला, लोन यांनी इंजिनीअर यांचे अभिनंदन केले. ‘मतदारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असून लोकशाहीत तेच महत्त्वाचे आहे. मात्र, या विजयाने इंजिनीअर तुरुंगातून लवकर मुक्त होऊ शकतील, असे मला वाटत नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांचा प्रतिनिधी खऱ्या अर्थाने मिळणार नाही, अशी प्रतिक्रीया अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.

जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग असतो, अशी प्रतिक्रिया मुफ्ती यांनी व्यक्त केली. त्यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानले. काश्मिरी जनतेने घराणेशाहीच्या विरोधात मतदान केले असल्याचे अपनी पार्टीचे संस्थापक अल्ताफ बुखारी यांनी म्हटले आहे.

भाजपने राखले गड

जम्मू आणि उधमपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासून आघाडी घेतली. पक्षाचे उधमपूरचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ५,७१,०७६ मतांनी विजय मिळविला. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी कॉँग्रेसचे चौधरी लालसिंह यांना ४,४६,७०९३ इतकी मते मिळाली. भाजपचे जम्मूचे विद्यमान खासदार जुगल किशोर शर्मा यांनी विजय मिळविला आहे. तेथे कॉँग्रेसच्या रमण भल्ला यांना त्यांनी पराभूत केले.
Lok Sabha Election Result: तुरुंगातून निवडणूक लढवूनही विजय; एक तर इंदिरा गांधींच्या मारेकऱ्याचा मुलगा, कोण आहेत हे उमेदवार?
कोण आहेत रशिद ?

लँगेट विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असलेले रशीद (वय ५६) यांना २०१९मध्ये अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यांना अटक केली होती. दहशतवादविरोधी कायद्याखाली कारवाई झालेले ते मुख्य राजकीय प्रवाहातील पहिले नेते आहेत. ते अजूनही कारागृहात असून त्यांचे पुत्र अब्रार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. निकालानंतर त्याने जनतेचे आभार मानले.

जम्मू-काश्मीर एकूण जागा : ५
भाजप – २
नॅशनल कॉन्फरन्स – २
अपक्ष – १

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.