Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Narendra Modi : ११ वर्ष जंग जंग पछाडलं पण मोदींचं काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न अधुरं

14

नवी दिल्ली : गोव्यात जून २०११३ मध्ये भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यावेळी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना २०१४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक प्रचार समितीचं अध्यक्ष बनवलं होतं. मोदींवर ही जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं, की ‘वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवत ही जबाबदारी दिली आहे. आता काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्वांच्या पाठिंब्या आणि आशीर्वादासाठी धन्यवाद’.

मोदींनी त्यावेळी आपल्या भाषणात काँग्रेस सरकार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन धारेवर धरलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी क्राँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न अससल्याचं ते म्हणाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या भाषणाला ११ वर्ष झाली, मात्र अद्यापही मोदींचं क्राँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न पूर्ण झालेलं नाही.

आता लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. पण नागरिकांनी भाजपला नाकारलेलंही नसल्याचं चित्र आहे. आता २०२४ मध्ये तिसऱ्यांदा मोदी सत्तेत येऊ शकतात.
माढा-सोलापुरात भाजपला आत्मविश्वास नडला? मोहिते पाटलांनी करुन दाखवलं; भाजपच्या निंबाळकरांना लाखभर मतांनी पाडलं

२०१४ मध्ये काँग्रेसला किती जागा मिळालेल्या?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी तुफान मोदी लाट होती. त्या मोदी लाटेत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या. त्याआधी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने २०६ जागा जिंकत सरकार स्थापन केलं होतं.

२०१९ मध्ये काय होती काँग्रेसची परिस्थिती?

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी अनेक रॅली आणि सभा घेतल्या. या प्रचारात त्यांनी काँग्रेसच्या कुटुंबवादावर निशाणा साधला होता. त्यावेळीही भारत काँग्रेसमुक्त झालं नाही. या निवडणुकीत भाजपने ३०३ जागा मिळवल्या होत्या. तर काँग्रेसने ५२ जागा मिळवल्या होत्या.

आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी मेहनत घेतली. तर दुसरीकडे मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधत कुटुंबवादाचे आरोप केले. पण यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचं नाणं वाजलं.

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केला केलेला हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ मे रोजी ईशान्य दिल्लीतील एका जाहीर सभेत मला कोणीही वारस नसल्याचे सांगितलं होतं. देशातील १४० कोटी लोक हेच माझे वारस आहेत. मी फक्त तुमच्या सर्वांसाठी रात्रंदिवस मेहनत करतो आहे. माझा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आहे. काँग्रेसच्या चार पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण आज त्यांच्याकडे दिल्लीत चार जागांवर लढण्याची ताकद नाही, असा आरोप पंतप्रधानांनी केला.

काँग्रेसने मारली बाजी

एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बहुमत मिळवतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. १३ एक्झिट पोलमध्ये NDA ला ३६५ आणि INDIA ला १४५ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. २०१९ मध्ये भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा भाजप २७२ जागादेखील मिळवू शकलं नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.