Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अवैधरित्या धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅसची रिंफिलींग करणार्या टोळीचा पर्दाफाश…

11

उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय,वैजापूर येथील पिंक पथकाने गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश…

वैजापुर(छ.संभाजीनगर) – बेकायदेशीररित्या एचपी च्या गॅस टँकर मधून गॅस चोरी करणाऱ्या चोरट्यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या पिंक पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण रित्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गॅसच्या टाक्या, टँकर, प्लॅस्टीकचे पाईप असा एकूण 1 कोटी 34 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात पोस्टे. गुरन. 284/2024 कलम 381 ,379. 406. 285,286, 34 भादंवि सहकलम 7,8,10 (A) अत्यावश्यक वस्तु अधि. 1955 प्रमाणे फिर्यादी- नितीन जयसिंग नलवडे (वय 35 वर्ष) पोउपनि. पिंक पथक उपविभाग वैजापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.04जून) रोजी रात्री 11.00 वाजेच्या सुमारास छ. संभाजीनगर ते अहमदनगर जाणारे रोडवरील भेंडाळा कॅफे या हॉटेलमध्ये ता.गंगापुर येथे चाकन गॅस डेपोमधुन नगर येथे जाणारे १८ टन वजनाचे गॅस टॅंकर थांबवुन टॅंकर ड्रायव्हरच्या संगनमताने काही इसम त्यातील गॅस विशिष्ट उपकरणाच्या सहाय्याने चोरी करतात व ते व्यवसाईक वापराच्या सिलेंडर मधे भरतात व गैरमार्गाने विकतात अशा खात्रीलायक गोपनीय माहीतीच्या आधारे पथक त्या ठिकाणी गेले असता पथकाने तिथे छुप्या पध्दतीने  सात ते आठ तास त्या ठिकाणी तळ ठोकून तसेच काही छुप्या पद्धतीने गस्त घालत होते. त्या नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच (दि.05जुन) रोजी 05.39 वा.सु. पथकाला टँकर दिसले तेथे जाऊन पाहिले असता तिथे 1)30,00,000 रुपये किंमतीचे एक अशोक लेलंड कंपनीचे टँकर क्र.एमएच 04 जेयु 8997 ज्या टँकरवर एच.पी. गॅस असे लिहलेले. व ज्या मध्ये गॅस भरलेला. रखमाजी वैजीनाथ सानप याच्या ताब्यातुन 2) 30,00,000 रुपये किंमतीचे एक अशोक लेलंड कंपनीचे टँकर क्र.एमएच 40 बीजी 6092 ज्याचे टँकरवर इग्रजीमध्ये एच.पी. गॅस असे लिहलेले. व ज्या मध्ये गॅस भरलेला.  सद्दाम मुजीब अन्सारी याचे ताब्यातुन 3)30,00,000 रुपये किंमतीचे एक अशोक लेलंड कंपनीचे टँकर क्र.एमएच 09 ईएम 2978 व ज्या मध्ये गॅस भरलेला. सदर वाहनाचा चालक फरार असल्याने घटना स्थळावरुन ताब्यात घेण्यात आले.4)30,00,000 रुपये किंमतीचे एक अशोक लेलंड कंपनीच टँकर क्र.एमएच 40 बीजी 5990 ज्या टँकरवर एच.पी. गॅस असे लिहिलेले व ज्या मध्ये गॅस भरलेला. नरेंद्र साधु यादव याचे ताब्यातुन 5) 10,00,000 रुपये किंमतीचे एक टाटा 407 टेम्पो क्र. एमएच 04 ईवाय 6341  चांगदेव सोपान जाधव याचे ताब्यातुन 6) 1,98,000 रुपये किंमतीचे एकुण 60 गॅसच्या टाक्या, खाली प्रती गॅस टाकीची किंमत 2000 असे एकुण 120000/- व सदरील 60 गॅसच्या टाक्या पुर्ण गॅसने भरलेल्या असुन प्रती गॅसच्या टाकी मधील गॅसची किंमत 1300/- रु. दराप्रमाणे एकुण 78000/- किंमतीच्या सदर गॅस टाक्या घटनास्थळी मिळुन आल्या. 7) 30,000 रुपये किंमतीचे एकुण 15 गॅस टाक्या ज्यात गॅस नसलेला ज्याची प्रती किंमत 2000/- रुपये सदर गॅस टाक्या घटनास्थळी मिळुन आलेल्या. 8) 10,000 रुपये किंमतीचे साहीत्य ज्यात प्लॅस्टीकचे पाईप ज्यास नोजल असलेले, 1,65,200/- रु.  अक्षय शिवाजी जाधव याच्यां ताब्यातुन रोख रक्कम ज्यात 500 रु दराच्या 281 नोटा, 200 रु दराच्या 106 व 100 रु दराच्या 35 नोटा. दराच्या नोटा.असा एकुण 1,34,03,200/- रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे.

या मधील आरोपी 1) अक्षय शिवाजी जाधव (वय 36 वर्ष) रा.रतडगाव, ता.जि.अहमदनगर 2) अमरसिंग लालासिंह (वय 22 वर्ष) रा.सांतलपुर ता.लालगंज, जि.रायबरेली 3) मिथलेशसिंह रनविजयसिंह (वय 26 वर्ष) रा.सातनपुर ता.लालगंज, जि.रायबरेली 4) रखमाजी वैजीनाथ सानप (वय 30 वर्ष) रा.दैठनाघाट ता.परळी जि.बीड 5) चांगदेव सोपाण जाधव (वय 24 वर्ष) रा.रा.रतडगाव ता.जि.अहमदनगर 6) विजय रावसाहेब कराळे रा.कापुरवाडी ता.जि.अहमदनगर 7) सद्दाम मुजीब अन्सारी (वय 29 वर्ष) रा.चैनपुर राज्य बिहार 8) नरेंद्रसाधु यादव (वय 28 वर्ष) रा.मसुरीयापुर ता.सबडी जि.आझमगड राज्य उत्तर प्रदेश 9) टँकर क्र.एमएच 09 इएम 2978 चा ड्रायव्हर (फरार) हे सर्व आरोपी साहित्यासह जिवीतास धोक्यात येणा-या गॅस या स्फोटक पदार्थाबाबत बेदकारपणे व हईगईपणाचे वर्तन करुन यातील टँकर वरील ड्रायव्हर आरोपीतांनी त्यांचे मालकाने विश्वासाने सोपविलेल्या गॅसच्या टँकरमधील गॅस स्वतःच्या फायदयासाठी व्यावसाईक वापराच्या सिलेंडर मधे बेकायदेशीररित्या गॅसची भरुन त्याची चोरटी विक्री करताना मिळुन आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया,अपर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार,सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वैजापुर महक स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली  उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय,वैजापुर येथील येथील पोलिस उपनिरीक्षक काळे,नलवडे,सरोदे,पोलिस अंनलदार अमोल मोरे जोनवाल    कदम,जगताप यांनी केली

 

 

The post अवैधरित्या धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅसची रिंफिलींग करणार्या टोळीचा पर्दाफाश… appeared first on Policekaka Crime Beat News 24X7.

Leave A Reply

Your email address will not be published.