Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या वरुन हे लक्षात येते की ६० लाख लोकांनी मत देत आपले कर्तव्य पूर्ण केले. पण लोकांनी कोणत्याही पक्षास किंवा उमेदवारास लायक समजले नाही त्यामुळे त्यांनी नोटाचा पर्याय निवडला. ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत मतदारांनी सर्वात जास्त २.१० टक्के बिहारमध्ये नोटाचे बटन दाबले. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात बिहारमध्ये सर्वात कमी मतदान झाले. पूर्ण देशात बिहारमध्ये सर्वात जास्त नोटा या बटनास मतदारांनी पसंती देण्याबाबत तज्ञांचे सांगितले की, बिहारमधील लोक मतदानाबाबत उदास होत चालले आहेत. नागालॅंडमध्ये नोटाला सर्वात कमी ०.२० टक्के मत लोकांनी दिले.
कमी मतदान झालेल्या राज्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण या दोन राज्यातील लोकांनी नोटाला मत देण्यास पसंती दर्शवली नाही. दोन्ही राज्यात एका टक्क्यांहून कमी नोटाचे बटन दाबण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये ०.७१ टक्के आणि महाराष्ट्रात ०.८३ टक्के मत नोटाला दिले. तर देशात पश्चिम बंगाल राज्यात जास्त मतदान झाले. या बाबतीत ते पहिल्या क्रमांकावर आहे. या राज्यांतील मतदारांनी एक टक्क्याहून कमी म्हणजे ०.९० टक्के मत नोटाला दिले. पण हा आकडा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांपेक्षा अधिक आहे.
या १० राज्यांत ‘नोटा’ ला मिळाले सर्वात जास्त मत
नोटाला सर्वात जास्त मत देण्याऱ्या १० राज्यांत बिहार, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, ओडिसा, असम, गोवा, आंध्र प्रदेश आणि झारखंड यांचा समावेश आहे. ज्यात लोकांनी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्ष उमेदवाराला मतदान देण्या योग्य समजले नाही. नोटाला सर्वात कमी मत नागालॅंड, लक्षद्वीप, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांत झाले. दिल्लीत कमी मतदान जरी झाले असले तरी येथील लोकांनी नोटाला मत देण्यात रस दाखवला नाही.
‘नोटा’ च्या बाबतीत इंदौर दुसऱ्या क्रमांकावर
मध्य प्रदेशमधील इंदौर या जागेवर निवडणुक लढवणारे भाजपचे उमेदवार शंकर लालवानी यांच्या व्यतिरिक्त निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बाकी १३ उमेदवारांना मिळालेल्या मत नोटापेक्षा कमी होते. या जागेवर भाजपच्या उमेदवाराला १२ लाख २६ हजारांपेक्षा जास्त मत मिळाले तर नोटा २ लाख १८ हजारांपेक्षा अधिक मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते. शंकर लालवानी यांच्या व्यतिरिक्त अन्य उमेदवारांस जवळपास १ लाख १६ हजार मते मिळाली, जे की नोटापेक्षा कमी होते.