Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

NDA Alliance : फिर एक बार मोदी सरकार! NDA कडून सत्तास्थापनेसाठी हिरवा कंदील

10

मुंबई : दोन टर्म पंतप्रधान राहिलेले देशाचे मावळते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. १७ वी लोकसभा विसर्जित झाली आणि नुकत्याच १८ व्या लोकसभेसाठी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. आता एनडीएकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. देशातील सर्व मित्रापक्षांसह मोदींनी आज दिल्लीत बैठक घेतले. लोकसभेचा निकाल जाहीर झालाय मात्र निकालात भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे यंदा भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागणार आहे. दिल्लीत एनडीएच्या सगळ्याच घटक पक्षांची बैठक पार पडली आणि चर्चेअंती एनडीएने नरेंद्र मोदींना चेहरा म्हणून निवडले आहे तसेच पंतप्रधान पदासाठी सुद्धा मोदींच्या नावाला एकमतांनी मंजूरी देण्यात आली आहे.

एनडीएच्या मंजूरीनंतर लवकरच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ४०० पार चा नारा देत भाजपने हवा केली होती पण मतदारांनी एनडीएचा आकडा ३०० च्या खाली आणून ठेवलाय. विरोधकांना गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला निकाल मिळलाय. मात्र इंडिया आघाडी सत्तास्थापनेपासून शंभर पावले मागे आहे.

Lok sabha Election Result 2024 : भाजपला पहिल्यांदाच मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार, काय होणार परीणाम ?

एनडीएच्या बैठकीत २६ पक्षांचे २१ नेते हजर झाले होते. सुत्रानुसार सात जूनला एनडीएच्या निवडून आलेल्या सर्वच खासदारांची बैठक दिल्लीत होणार आहे. यानंतर एनडीए राष्ट्रपतींकडे सत्तास्थापेनाचा दावा करेल अशी माहिती मिळते. राजनाथ सिंह, अमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्याकडे मित्रापक्षांसोबत बोलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आजच्या बैठकीत सीएम शिंदे सुद्धा दाखल झाले होते तर अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल दाखल झाले होते.

लोकसभेत सत्तास्थापनेसाठी साधारण २७२ जागांची आवश्यकता असते मोदी सरकारने २४० जागांवर विजय मिळवला त्यामुळे त्यांना जेडीयु आणि टीडीपी यांची साथ सत्तास्थापनेसाठी लागणार आहे. टीडीपीला १६ जागांवर तर जेडीयुला १२ जागांवर विजय मिळलाय त्यामुळे भाजपच्या सत्तास्थापनेत या दोन पक्षांचा किंग मेकर म्हणून समावेश आहे. तर राज्यात शिंदे गटाला सात जागांवर यश मिळाले त्यामुळे एनडीएत शिंदेंची सेना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.