Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 6 जून 2024 : 6 मूलांक असणाऱ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवा ! कामे मार्गी लागणार ! जाणून घ्या, तुमचा दिवस कसा असेल?
मूलांक 1: ताणतणाव वाढण्याची शक्यता
मूलांक एक असणाऱ्यांना आज काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. अशा परिस्थितीत थकवा आणि ताणतणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्यावरही लवकरच होऊ शकतो, तेव्हा तब्येतीची काळजी घ्या. एकूणच आजचा दिवस त्रासदायक आहे असे म्हणावे लागेल.
मूलांक 2 : सकारात्मक विचारांनी पुढे जा

मूलांक दोन असणाऱ्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे. कुटुंबातील एखाद्याच्या सहवासामुळे अनुकूल परिणामांच्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तुम्ही सकारात्मक विचार करून पुढे जा. तुमच्या क्षमतांचे मूल्यांकन करा आणि त्यानुसार तुमचे ध्येय साध्य करा, हे सर्वोत्तम आहे.
मूलांक 3 : रखडलेली कामे मार्गी लागणार

मूलांक तीन असणाऱ्यांचा पूर्ण वेळ आज धार्मित कार्यात जाणार आहे. तुम्ही धार्मित कार्यात सहभागी झाल्यामुळे तुम्हाला इतर गोष्टींसाठी जास्त वेळ मिळणार नाही. तुमची बिघडलेली किंवा रखडलेली कामे आज पूर्ण होणार आहेत त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
मूलांक 4: वरिष्ठांचा सल्ला घ्या, संभ्रम दूर करा

मूलांक चार असणाऱ्या जातकांची इच्छा आज पूर्ण होणार आहे. तुम्ही जो काही विचार केला होता त्याप्रमाणे घडणार आहे. तुम्हाला जर कोणता संभ्रम असेल किंवा शंका असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला तुमच्या शंकांची उत्तरे अतिशय सकारात्मक पद्धतीने मिळतील.
मूलांक 5 : व्यवसायात जोखीम घ्यायला हवी

मूलांक 5 च्या लोकांनी व्यवसायात जोखीम घेण्याची आणि काही तरी नवीन करून दाखविण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जा. तुमचा स्वतःवरचा विश्वास तुम्हाला विजयी बनविणार आहे.
मूलांक 6: स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करा

मूलांक 6 असणाऱ्यांना आज महत्त्वाचा सल्ला आहे. तुम्ही जे काही कार्य कराल त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. पूर्ण विश्वासाने कृती करा आणि रूढीवादी वृत्ती टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही क्रिएटीव्ह आहात आणि त्याचा तुम्ही स्विकार करा. तुमची सर्जनशीलता तुम्हाला मोठा फायदा करून देणार आहे. लक्षात ठेवा तुमची कार्यशैली लोकांवर प्रभाव टाकण्यास सक्षम असेल.
मूलांक 7: नवीन लोकांच्या भेटीचा फायदा

मूलांक 7 असणाऱ्यांना लोकांनी व्यक्त व्हायला हवं. तुम्हीला काही खटकत असेल तर बोला, तुम्हाला कोणती भीती वाटत असेल तर त्याबद्दल सांगा. बाजारात होणारी चढउतार याचा थेट परिणाम तुमच्या कामावर दिसून येणार आहे. काही नवीन लोकांच्या भेटीमुळे फायदा होईल.
मूलांक 8: नवीन कामे सुरु होण्याची शक्यता

मूलांक 8 ज्या व्यक्ती जर आज कोणाला भेटायला जाणार असतील तर तुमच्या पोशाखाकडे पूर्णपणे लक्ष द्या. आज काही नवीन काम सुरू होऊ शकते. आज असे कोणीतरी भेटणार आहे ज्याच्या सोबत तुम्ही सखोल ओळख होणार आहे.
मूलांक 9: नातेसंबंधात घाई नको

मूलांक 9 असणाऱ्यांनी लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीत घाई करणे, घातक असू शकते. त्याचप्रमाणे नातेसंबंधात घाई-गडबड टाळायला हवी. तुम्ही योग्य निर्णय घेतला तरच प्रेमात यशस्वी होवू शकता. तुम्ही जर एखाद्यासोबत रिलेशनशीपमध्ये असाल तर आज लवलाइफमध्ये बदल दिसून येणार आहेत.