Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
बनावट कागदपत्रांवर आरटीई प्रवेश घेणाऱ्या पालकावर नागपुर येथे गुन्हा दाखल…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून शिक्षण विभागाची दिशाभूल करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांवर नागपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी कवड्डु रामेश्वरराव दुर्गे, (वय ५७ वर्ष), नोकरी गट शिक्षण अधिकारी, पं.स. नागपूर रा.प्लॉट नं.183, वार्ड नं.08, मानस मंदीर वर्धा, पो.ठाणे रामनगर, वर्धा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३२४/२०२४ कलम ४२०,४६५,४६८,४७१,३४ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, पत्रक/प्राशिसं./प्रप्र/आरटीई ५२०/२०२३/५१३ (दि.२०जानेवारी २०२३) अन्वये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. गट साधन केंद्र पंचायत समिती, नागपूर अंतर्गत तालुका पडताळणी समिती, मार्फत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांपैकी निवड झालेल्या बालाकांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली याद्वारे नागपुरातील प्रतिष्ठीत अशा शाळामधे शासनाच्या नियमानुसार प्रवेश मिळवता येतो
बालकांची आरटीई अंतर्गत निवड झाल्यानंतर पालकांनी त्यांचे पाल्यांचे प्रवेशाकरिता गट साधन केंद्र पंचायत समिती, नागपूर येथे आवश्यक कागदपत्रे सादर केली. शिक्षण संचालक, प्राथमीक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे-१, यांचे पत्र क्र.१/प्रशिसं/प्रप्र/आरटीई ५२०/२०२३/५१३ (दि.२०जानेवारी२०२३) नुसार तालुका पडताळणी समिती मार्फत कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश दिल्यानंतर पालकांनी बनावट रहिवासी पुरावे सादर केल्याचे खालील पालक यांनी सादर केल्याचे चौकशी अंती निदर्शनास आले.
१) प्रशांत हेडाउ, अर्ज क्र.23NG052337 संपर्क क्र. ७४९८२०८५८४ यांनी बनावट रहिवासी पुरावा, पोद्यार
सकुल वेळाहरी, नागपूर येथे सादर केला.
२) राजेश बुवाडे, अर्ज क्र. 23NG039949 संपर्क क्र. ८२०८४४६७७८ यांनी बनावट रहिवासी पुरावा, रॉयल गोंडवाना पब्लीक स्कुल नागपूर येथे सादर केला.
हे दोन्ही पालक हे उचिचशिक्षित असुनही त्यांना अशाप्रकारे गैरप्रकार करण्याचा मोह आवरला नाही किंबहुना त्यांनी या योजनेस पात्र वंचीत कुंटुंबातील विद्यार्थायांचा हक्राचा शिक्षणाचा अधिकार हिराऊन घेतला
शिक्षण संचालक, प्राथमीक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे १, यांचे पत्र क्र.१/प्रशिसं/प्रप्र/ आरटीई- ५२०/२०२३/५१३ (दि.२०जानेवारी २०२३) मधील सुचनांनुसार पालकांनी सादर केलेल्या हमीपत्रात “हमी पत्र लिहुन देतो/देते की आर.टी.ई. २००९ अंतर्गत २५ टक्के प्रवेश शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या प्रक्रियेसाठी मी सादर केलेली कागदपत्रे बरोबर असुन मी आर.टी.ई. पोर्टल वर माहीती बरोबर भरली आहे. भविष्यात अथवा पडताळणी समीती ने कागदपत्रांची व पोर्टल वर भरलेल्या माहीतीची पडताळणी केल्यास व त्यामुळे चुकीची कागदपत्रे व अथवा माहीती भरल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल, माझ्यावर फौजदारी कारवाई होईल किंवा प्रतिपुर्तीची रक्कम शासनाकडुन मिळणार नाही. त्यामुळे शाळेची सर्व फी भरणे मला बंधनकारक राहील. उपरोक्त पैकी एक किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा होतील याची मला जाणीव आहे.” असे नमुद केले आहे.
शिक्षण संचालक, प्राथमीक शिक्षण संचालनालय म.रा.पुणे -१ तालुका पडताळणी समीती ने वर नमुद पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांचे पालकांचे प्रवेश त्वरीत रद्द करण्यात आले. तसेच वर नमुद पालकांनी बनावट रहिवासी पुरावे सादर करून प्रवेश मिळविल्याने संदर्भ क्र. २) शिक्षणाधिकारी (प्राथ), जि.प. नागपूर यांचे पत्र क्र. जिपना/शि/प्राथ/आरटीई/४१६०/२४, (दि.०८मे) चे आदेशान्वये फिर्यादीने आरोपी पालक १) प्रशांत गजानन हेडाउ, (वय ३५ वर्ष), रा.फ्लॅट नं. ४०२, तुलीप १. ग्रिन सिटी अपार्टमेंट ४ गिताल्प गोल्ड अपार्टमेंट, अयोध्यानगर, महात्मा गांधी चौक, तह नागपूर, नागपूर २) राजेश शिवपाल बुवाडे (वय ३९ वर्ष) रा.खसरा नं. ४४१, फ्लॅट नं. ४१३, विंग सी, कस्तुरी गार्डन गोटाड पांजरी, तह. नागपूर, नागपूर यांचे विरूध्द सरकार तर्फे फिर्यादी यांनी कायदेशीर कारवाई करिता लेखी तक्रार दिली. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. सदर नागपुर शहर अपराध क्र.३२४/२०२४ कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला.
नमुद गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपी १) प्रशांत गजानन हेडाउ, (वय ३५ वर्ष), रा.फ्लॅट नं.४०२, तुलीप १, ग्रिन सिटी अपार्टमेंट ४ गिताल्प गोल्ड अपार्टमेंट, अयोध्यानगर, महात्मा गांधी चौक, तह. नागपूर, नागपूर २) राजेश शिवपाल बुवाडे (वय ३९ वर्षे) रा.खसरा नं. ४४१, फ्लॅट नं. ४१३, विंग सी, कस्तुरी गार्डन गौटाड पांजरी, तह. नागपूर, नागपूर यांना अटक करण्यात आली असुन त्याकडे तपास क सदर आरोपी हे न्यायालयीन कोठडीवर आहे.
प्रस्तुत गुन्हयाचे अनुषंगाने आरोपींचा तांत्रिक माहितीव्दारे व गोपनीय माहितीवरून यातील मुख्य आरोपी शाहीद शरीफ याचा भाऊ राजा जमशिद शरीफ, (वय ३१ वर्ष), रा.प्लॉट नं.३८, अनंत नगर, बस स्टॉप जवळ, गिट्टीखदान, नागपुर हा गुप्त बातमीदार व तांत्रीक माहितीच्या आधारे हा स्वतःचे चारचाकी वाहनाने नागपुर सोडण्याचे तयारीने टी. व्ही. टॉवर ते फुटारा रोड, पो.ठाणे गिट्टीखदान, नागपुर येथुन जात असताना वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनात लगेच प्लॅन बनवुन अत्यंत शितीफिने गाडीचा पाठलाग केला असता आरोपी हा पोलिसांची गाडी पाहुन गाडी जोरात पळवुन जात असतांना त्यांचा कार्यवाही करणारे अधि. व कर्मचारी यांचे मदतीने लगेच घेराव करून ताब्यात घेवुन अटक करण्यात आले असुन न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आली आले.याप्रकरणाचा मुख्य सुत्रधार शाहीद हा फरार असुन त्याचा कसुन शोध सुरु आहे त्याला अटक होताच शिक्षण विभागातील बडे मासे अडकण्याची शक्यताही नाकारता येत नाही
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(उत्तर विभाग) प्रमोद शेवाळे,पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्र.२ राहुन मदने,सहायक पोलीस आयुक्त, माधुरी बाविस्कर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मनिष ठाकरे,पोलिस निरीक्षक (गुन्हे) अरूण क्षिरसागर, पोलिस उपनिरीक्षक निलेश घोगरे, मसपोनि विजया म्हेत्रे, पो. हवा दुर्गेश ठाकुर, पो.हवा अमोल दौदंलकर, पो.हवा रविन्द्र लाड, नापोशि संजय यादव, नापोअँ मोहनसिंग ठाकुर, नापोशि सय्यद हदब, पोशि. सचिन कावळे, पोशि. राजेंद्र वानखेडे, पोअं. धनपत माझरेते, पोअं विक्रमसिंग ठाकूर, सर्व नाम पोलीस अधिकारी, नागपुर शहर यांनी केली आहे.