Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुमच्या हेल्थसाठी हे स्मार्टवॉचेस ठरतील गुंतवणूक, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

13

यावेळी प्रसिद्ध धावपटूंनी फिटनेस ट्रॅकर डिवेसेसला हायलाईट केले. भारतात स्मार्टवॉचची लोकप्रियता वाढली आहे. असे असतांना Garmin (गार्मिन) या ब्रँडच्या वॉचेस ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. उत्तम बॅटरी लाइफसाठी देखील हा ब्रँड ओळखला जातो. यात काय आहे खास सविस्तरपणे जाणून घेऊया..

Garmin फोररनर 165

ब्रँडच्या फोररनर मालिकेतील नव्याने लाँच केलेले स्मार्टवॉच क्रीडापटू आणि धावपटूंसाठी डिझाइन केलेले आहे. तसेच, हे कस्टमाईज ट्रेनिंग आणि फिटनेस मेट्रिक्स फिचर ऑफर करते. यात AMOLED टचस्क्रीन डिस्प्ले, 11 दिवसांपर्यंतची उत्तम बॅटरी लाइफ आणि Pulse OX ब्लड ऑक्सिजन सॅचुरेशन मॉनिटर, बॅरोमेट्रिक अल्टिमीटर, फ्लोअर क्लाइंब, कंपास आणि नवीन पिढीचा एम्बिएंट लाइट सेंसर आहे. याशिवाय वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 1.2-इंच टच डिस्प्ले आणि 50 मीटरपर्यंत वॉटर रेझिस्टन्सचा समावेश आहे.

स्मार्टवॉच मनगटावर वेअर करण्यात येणारे हे डिवाईस ऽ रनिंग पॉवर आणि डायनॅमिक्स, ट्रेनिंग इफेक्ट इनसाइट्स कस्टमाईज करता येण्याजोगे कोर्स आणि 25 हून अधिक ऍक्टीव्हीटीज प्रोफाइल देखील देते. भारतात त्याची किंमत 33,490 रुपये आहे. हा ब्रँड दोन वर्षांची वॉरंटी देतो आणि ब्रँड-अधिकृत स्टोअरमध्ये देखील उपलब्ध आहे.

Garmin एचआरएम-प्रो प्लस

गार्मिन एचआरएम-प्रो प्लसमध्ये तुम्हाला हॉर्ट रेट मॉनिटरच्या पलीकडे इतर अनेक दमदार फिचर्स मिळतात. हे रिअल-टाइम हॉर्टरेट डेटा कंपेटीबल डिव्हाइसेस आणि ॲप्सवर ट्रांसमीट करते. हे बॅटरीचे लाइफ आणि एक वर्षापर्यंत चालणारे डायनॅमिक्स देण्यात आले आहे. ते तुमच्या गार्मिन स्मार्टवॉचशी कनेक्ट केल्याने तुम्हाला इनडोअर धावण्याचा अचूक स्पीड आणि अंतर हा डेटा मिळतो.

Google Pixel Watch 2

Google च्या या स्मार्टवॉचमध्ये सुंदर पेबल शेप आणि एज-टू-एज डिजाईन देण्यात आली आहे, जी चांगल्या फिटनेस ट्रॅकिंगसाठी Google च्या Wear OS आणि Fitbit ला एकत्रित इंटीग्रेट. यात चमकदार, यात AMOLED डिस्प्लेसह मल्टी-पाथ एचआर सेन्सर आणि फास्ट-चार्जिंग बॅटरी लाइफ आहे. या स्मार्टवॉचची किंमत 39,000 रुपये इतकी आहे

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.