Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सर्व नेते मोदींपेक्षा चांगले… चंद्राबाबू नायडू यांचं पंतप्रधानांबाबत वक्तव्य? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य?
व्हिडिओमध्ये काय म्हटलंय?
५ जून रोजी एका युजरने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिलेलं, की सर्व नेते नरेंद्र मोदींहून चांगले – चंद्राबाबू नायडू.
याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओ हा एका न्यूज चॅनेलची क्लिप आहे.
कशी केली व्हिडिओची सत्यता पडताळणी?
व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी, विश्वास न्यूजने गुगल लेन्सच्या मदतीने त्याचे कीफ्रेम शोधले. ज्यावरून त्यांना ११ फेब्रुवारी २०१९ रोजी एएनआय या वृत्तसंस्थेच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केलेले फोटो मिळाले. त्या पोस्टमध्ये अशी माहिती देण्यात आली होती, की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत एकदिवसीय उपोषण करताना म्हटलेलं, की सध्याचे पंतप्रधान आणि एनडीए सरकार देशाचं विभाजन करत आहे. ते लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं अभियान चालवत आहेत. त्यांना राजकीय लाभ हवा आहे, पण तसं होऊ शकत नाही.
व्हायरल झालेला व्हिडिओ एनडीटीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवरही मिळाला. हा व्हिडिओ १२ फेब्रुवारी २०१९ रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ६.५० मिनिटांनंतर व्हायरल झालेली क्लिप पाहता येऊ शकते.
लोकसभा निवडणुकीत भाजपला २४० तर टीडीपीला १६ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी ५ जून रोजी एनडीएसोबतच्या बैठकीचे फोटो पोस्ट केले आणि लिहिलंय की, आपल्या देशातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करत, दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व एनडीए मित्रपक्षांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपण सर्वजण आपला देश समृद्ध होत राहावा आणि जागतिक नेता म्हणून उदयास येण्यासाठी प्रयत्नशील राहू.
याबाबत आंध्र प्रदेशचे स्थानिक पत्रकार श्री हर्ष यांनी चंद्राबाबू नायडू यांनी पाच वर्षांपूर्वी दिल्लीत हे विधान केल्याचं म्हटलं आहे. जुना व्हिडिओ शेअर करणाऱ्या फेसबुक युजरचं प्रोफाइल चेक करण्यात आलं. त्यावेळी तो युजर पश्चिम बंगालमधील कलियाचक इथे राहणारा असून ते एका विचारसरणीने प्रभावित आहे.
निष्कर्ष
व्हायरल व्हिडिओच्या तपासात चंद्राबाबू नायडू यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचं हे विधान पाच वर्षे जुनं असल्याचं समोर आलं आहे. याचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही.
(This story was originally published by Vishvas News, and republished by MT as part of the Shakti Collective.)