Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकांच्या नजारा वळतील या बजेट फोनकडे; CMF Phone 1 लवकरच येतोय भारतात

14

Nothing चे सीईओ कार्ल पेई यांनी अलीकडेच Nothing Phone (3) लाँच 2025 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली होती. आता कंपनीच्या सब-ब्रँड CMF नं आपल्या पहिल्या स्मार्टफोन लाँचची माहिती दिली आहे, जो CMF Phone 1 नावाने ओळखलं जाईल. टीजर इमेजवरून आगामी स्मार्टफोन मध्ये काय मिळेल याची झलक मिळाली आहे. विशेष म्हणजे CMF बजेट सेगमेंटसाठी तयार करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया CMF Phone 1 ची संपूर्ण माहिती.

CMF Phone 1 लवकरच होईल लाँच

CMF नं एक ट्वीटमध्ये सांगितलं आहे की ब्रँडचा पहिला स्मार्टफोन डिजाइनच्या बाबतीत जबरदस्त आहे. हा नथिंगच्या जगावेगळ्या स्टाइल आणि डिजाइनची आठवण करून देईल. Nothing सब-ब्रँड त्या सेगमेंटवर फोकस करत आहे ज्याकडे दुर्लक्ष केलं जातं. CMF Phone 1 कंपनीच्या प्रोडक्ट इकोसिस्टमसाठी एक एंट्री पॉईंट असेल.

CMF Phone 1 मध्ये नथिंग स्मार्टफोन सारखी डिजाइन मिळण्याची अपेक्षा नाही. टीजर फोटोवरून खुलासा झाला हे की यात ट्रान्सपरंट बॅक पॅनल आणि ग्लिफ इंटरफेस नसेल. त्याऐवजी आगामी स्मार्टफोनमध्ये ऑरेंज शेडमध्ये लेदर लुक असलेला बॅक पॅनल दिला जाऊ शकतो जो सब-ब्रँडच्या डिवाइसेजवर असतो. डिवाइसच्या खाली डावीकडे एक डायल देखील आहे जो Neckband Pro मध्ये दिसला होता. CMF Phone 1 इतर डिवाइसेज प्रमाणे भारतात ई-कॉमर्स साइट Flipkart वर उपलब्ध होईल.

CMF Phone 1 ची किंमत

CMF Phone 1 ची किंमत 249 डॉलर्स (सुमारे 21,000 रुपये) ते 279 डॉलर्स (सुमरे 23,000 रुपये) दरम्यान असू शकते. हा स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.अ‍ॅप्पल-सॅमसंगला देखील झेपलं नाही ‘हे’ काम; येतोय सर्वात मजबूत वॉटरप्रूफिंग असलेला पहिला फोन भारतात

CMF Phone 1चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

लीक झालेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार, CMF Phone 1 मध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळेल. फोनमध्ये Mediatek Dimensity 7200 चिपसेट देण्यात येईल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.