Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nitish Kumar: पूर्णपणे तुमच्यासोबत राहू, नितीशबाबूंची हमी, मोदी खळखळून हसले

13

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिलं आहे. यावेळी नितीश कुमारांनी भाषणादरम्यान अशी फटकेबाजी केली की उपस्थित सर्व नेत्यांसह नरेंद्र मोदीही खळखळून हसले.

नरेंद्र मोदी हे आता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी हे येत्या ९ जूनला सायंकाळी ६ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. एनडीएच्या संसदीय दलाची आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी एनडीएतील सर्व घटक पक्षांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनीही मोदींच्या नावाला संमती दिली आणि यासोबतच नितीश कुमार वेगळा निर्णय घेणार या चर्चांवर पाणी ओतलं आहे.

आता जे जिंकले आहेत ते मोदी आल्यावर हरतील – नितीश कुमार

जनता दल युनायटेड ही भाजपच्या संसदीय दलाचे नेते नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी समर्थन देते. आनंदाची बाब आहे की हे गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी संपूर्ण देशाची सेवा केली, पूर्ण विश्वास आहे की जे काही शिल्लक आहे, पुढच्या वेळी ते सारं करतील. आम्ही पूर्णपणे, रोज यांच्यासोबत राहू. मला वाटतं की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही याल, यावेळी इकडे-तिकडे जे कोणी जिंकले आहेत, ते सर्व हारतील. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या बोलण्यात काहीही तत्थ्य नाही, त्यांनी काहीही काम केलेलं नाही. त्यांनी आजपर्यंत काहीच काम केलेलं नाही, देशाची कुठल्याप्रकारे सेवा केलेली नाही, पण तुम्ही इतकी सेवा केली, तरीही असं झालं. यावेळीही तुम्हाला संधी मिळाली आहे, आता त्यांच्याकडे काहीही उरलेलं नाही. ते आता संपतील. देश आणखी प्रगती करेल. बिहारचंही जे काही काम राहिलंय तेही होऊनच जाईल, नितीश कुमार असं म्हणताच नरेंद्र मोदींसह संपूर्णहॉलमध्ये एकच हशा पिकला.

तुम्ही म्हणाल त्या कामात आम्ही तुमचं समर्थन करु आणि आम्ही एकत्र राहू, तुमच्या सोबत राहू, देशाला पुढे नेऊ. लवकरात लवकर तुम्ही पंतप्रधानपदाची शपथ घ्यावी अशी इच्छा आहे. तुम्ही रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहात, माझी तर इच्छा होती की तुम्ही आजच शपथ घ्यावी. जेवढ्या लवकर कामाला सुरुवात होईल तेवढं चांगलं आहे. देशात याचा जास्त फायदा होईल. मी तुमचं अभिनंदन करतो, असं म्हणत नितीश कुमारांनी मोदींवर विश्वास दाखवला.

मोदींसारखा ताकदवान नेता पहिल्यांदाच पाहिला- चंद्राबाबू नायडू

यावेळी चंद्राबाबू नायडू यांनीही भाषण केलं. ‘पंतप्रधानांनी न थांबता रात्रंदिवस काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रगती केली आहे. तसेच नरेंद्र मोदींनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. सार्वजनिक रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर राहिले. मी राजकारणात बराच काळ घालवला आहे आणि या दरम्यान मी हजारो लोकांना भेटलो आहे. पण, नरेंद्र मोदींसारखा ताकदवान नेता मला पहिल्यांदाच भेटला आहे, असं ते म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.