Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तिसरे मोदीपर्व सुरु होणार! 8 चा शुभयोग नाही, नरेंद्र मोदी पंतप्रधान पद शपथविधी सोहळ्यासाठी नवा मुहूर्त ठरला
सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करताच नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष भाजपसह एनडीएच्या खासदारांनी केला. आधी मोदींनी संविधानाला नमन केलं. तर पुढे जात सत्तास्थापनेतील महत्त्वाचे घटक असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी हस्तांदोलन केलं.
एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीला संबोधित करत मोदी सरकारचा रोडमॅप मांडणार आहेत. येत्या रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपला एकट्याला स्वबळावर बहुमत गाठण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे मित्रपक्षांची साथ अशा परिस्थितीत महत्त्वाची ठरत आहे.
२०२४च्या सुरुवातीला भाजपमधून ‘एनडीए चारसो पार’चा नारा दिला गेला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत, एकटा भाजप ३७० अशी दुरुस्ती करताना याचीच पुष्टी केली. त्यानंतरच्या चारच महिन्यांत भारतीय मतदाराने आपले असे शक्तिप्रदर्शन केले की, घटकपक्षांच्या आधाराशिवाय भाजप बहुमत गाठत नसल्याचे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागत असताना स्पष्ट झाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
राज्यघटना बदलाचा आरोप वर्मी
भाजपला मिळालेल्या धक्क्यामागे आणखी एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राज्यघटना बदलाचा. साडेतीनशेचे एनडीए बळ असलेल्या मोदींना लोकसभेत यंदा ‘चारसो पार’ असे पाशवी बहुमत का हवे आहे, तर ते राज्यघटना बदलण्यासाठी हा काँग्रेसचा प्रचारबाण अगदी अचूक लागला. देशभरातील दलितांमध्ये हा संदेश खोलवर गेला व या वर्गात अत्यंत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. उत्तर प्रदेशात मायावतींचा दलित मतदार भाजपची साथ सोडून गेला त्याचे हेच एक ठळक कारण मानले जाते.