Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

NOTA: जम्मू-काश्मीरमधील मतदारांकडून उमेदवारांना ठेंगा; ६८ टक्के उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते

11

वृत्तसंस्था, श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील लोकसभा निवडणुकीच्या पाच जागांवर एकूण शंभरपैकी ६८ टक्के उमेदवारांना ‘वरीलपैकी काहीही नाही’ (नोटा) पेक्षाही कमी मते मिळाली आहेत, असे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत दिसून आले आहे. एकूण ३४,७८८ मतदारांनी ‘नोटा’ समोरचे बटण दाबून उमेदवारांना नाकारले आहे.

जम्मू विभागातील उधमपूर येथे सर्वाधिक १२,९३८ ‘नोटा’ मते मिळाली. तेथून भाजपचे उमेदवार जितेंद्र सिंह विजयी झाले. उधमपूरमधून ११ पैकी नऊ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा अधिक मते मिळाली. शेजारच्या जम्मू मतदारसंघात ४,६४५ मतदारांनी ‘नोटा’ चा वापर केला. यापैकी १८ उमेदवारांना वैयक्तिकरित्या मिळवलेल्या मतांपेक्षा ‘नोटा’ची मते अधिक आहेत. भाजपच्या जुगल किशोर यांनी हा मतदारसंघ राखला आहे.

श्रीनगरच्या जागेवर ‘नोटा’ च्या मतांची संख्या ५,९९८ होती. मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी बहुतेक १८ उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते मिळाली. अनंतनाग-राजौरी मतदारसंघात ६,२२३ मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती दिली. या जागेवर वीस उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी नऊ उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते मिळाली.
Mumbai NOTA Vote: नाराज मतदारांची ‘नोटा’ला पसंती, मुंबईत ७५ हजार जणांचा नकाराधिकार, कुठल्या मतदारसंघात सर्वाधिक?
बारामुल्ला येथे ४,९८४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय वापरला. येथे २२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १४ उमेदवारांना कमी मते मिळाली. दरम्यान, ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरचा भाग असलेल्या लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देत कलम ३७० रद्द केले. तेव्हा ‘नोटा’ फक्त ९१२ मतदारांनी पसंती दिली. येथे फक्त तीन उमेदवार रिंगणात होते. त्या सर्वांना ‘नोटा’ पेक्षा अधिक मते मिळाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.