Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्मार्टफोन सोबत स्मार्टवॉच फ्री; 9 हजारांत 108MP कॅमेरा असलेला हा शानदार फोन

11

10 हजारांच्या आत 108 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन सादर करण्याची कामगिरी itel काही दिवसांपूर्वी केली होती. आता हाच हँडसेट आणखी स्वस्त झाला आहे. यासाठी कंपनीनं Amazon India वर itel Days सेलची घोषणा केली आहे. हा सेल 14 जून पर्यंत सुरु राहील. या बंपर सेलमध्ये itel S24 जबरदस्त डिस्काउंटसह खरेदी करता येईल. 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन 1 हजार रुपयांच्या थेट डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. फ्लॅट डिस्काउंट नंतर हा फोन 8,999 रुपयांमध्ये तुमचा होईल.

itel S24 वरील ऑफर

या डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवरून ईएमआय ट्रँजॅक्शन करावे लागेल. या फोनवर सुमारे 500 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना icon 2 स्मार्टवॉच फ्री मिळेल. आयटेलच्या या फोनवर 9,400 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारा डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या कंडीशन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.
10 हजारांच्या आत आला Realme चा फोन; असे आहेत फीचर्स

itel S24 चे स्पेसिफिकेशन्स

आयटेलच्या या फोनमध्ये तुम्हाला 720×1612 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. फोनमधील हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोन 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह आला आहे. मेमरी फ्यूजन फीचरच्या मदतीनं या फोनचा रॅम 16जीबी पर्यंत वाढवता येतो. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G91 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे तुम्हाला एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल.

यात 108 मेगापिक्सलच्या मेन लेन्ससह एक QVGA डेप्थ सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. itel S24 ची बॅटरी 5000mAh ची आहे. ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन itel OS 13 वर चालतो, जो अँड्रॉइड 13 आधारित आहे. बायोमेट्रिक सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.